दाऊदचा हस्तक सलीम फ्रुटला अटक, एनआयएची मोठी कारवाई

कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमसाठी हवाला रक्कमेची फेरफार करत असल्याच्या संशयावरून सलीम फ्रूटला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency) त्याला गुरुवारी अटक केलं. तसेच, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक प्रकरणातही सलीम फ्रुटचं नाव समोर आलं होतं.

मुंबई सेंट्रलमधील अरब लेन भागातून सलीम मोहम्मद इक्बाल उर्फ सलीम फ्रुट याला अटक करण्यात आली. तस्करी, अमली पदार्थांद्वारे दहशतवादी कृत्ये, मनी लॉन्ड्रिंग, दहशतवादी कारवायांसाठी निधी जमा करणे, मालमत्तेचा अनधिकृत ताबा घेऊन तो निधी लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि अल कायद्यासारख्या संघटनांना पुरवणे असे आरोप त्याच्यावर लावण्यात आले आहेत. म्हणून त्याला National Investigation Agency ने अटक केली. पुढील तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.