घरमुंबई"या राज्याला मुख्यमंत्री नाही तर मख्खमंत्री आहेत", संजय राऊतांची कठोर शब्दात टीका

“या राज्याला मुख्यमंत्री नाही तर मख्खमंत्री आहेत”, संजय राऊतांची कठोर शब्दात टीका

Subscribe

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या फसवणुकीप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी जोरदार प्रत्त्तूत्तर दिलंय.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत अनिक्षा जयसिंघानीयाला अटक केली. त्यानंतर याप्रकरणी पत्नी अमृता फडणवीस यांना एका डिझायनर महिलेकडून फसवणूक आणि ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा फडणवीसांनी केला. तसेच हा एक राजकीय कट आहे. जोपर्यंत पुरावा हाती येत नाही तोपर्यंत बोलणार नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी जोरदार प्रत्त्तूत्तर दिलंय.

यावेळी बोलताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधलाय. ‘देवेंद्र फडणवीस हे राज्याचे खरे सुत्रधार आहेत. राज्यात सुरू असलेले खदखद देवेंद्र फडणवीसांनी समजून घेतली पाहिजे. लोकांमध्ये अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुन्हेगारांचा बचाव करत आहेत. त्यांच्याबरोबर काम करत असताना पाच वर्षाचा राज्यकारभार आम्ही पाहिलेला आहे. त्यांचं प्रशासन पाहिलेलं आहे. पण पूर्वीसारखे देवेंद्र फडणवीस आता दिसत नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे हात दगडाखाली आहेत. देवेंद्र फडणवीस काहीच करू शकत नाहीत. अशा वेळी देवेंद्र फडणवीस नाकाने कांदे सोलण्याचा प्रयत्न करत आहेत.”, असा घणाघात यावेळी संजय राऊतांनी केलाय.

- Advertisement -

तसंच अमृता फडणवीस यांच्या फसवणुकीप्रकरणी महाविकास आघाडीच्या काही नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची नावे असल्याच्या चर्चांबाबात संजय राऊतांना माध्यमांनी सवाल केला. यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचे प्रकरण हे कौटूंबिक आहे. भाजपाला जसं दुसऱ्यांच्या कुटूंबात शिरण्याची सवय आहे, तशी सवय आम्हाला नाही. आम्ही कुटूंबापर्यंत जात नाही. आमच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत आणि ते आम्ही कायम पाळतो. आमच्यावर बोट करताना स्वतःकडेही काही बोट येतात. मला तोंड उघडायला लावू नका.”, असं म्हणत संजय राऊत भडकले.

एखाद्या महिलेला ब्लॅकमेल करणं हे निंदनीय आहे, मग त्या मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्याच्या पत्नी असोत किंवा मग एक सामान्य महिला असो. ही घटना पाहता पोलीसांना कायद्याचा धाक राहिलेला नाही किंवा पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचं देखील संजय राऊतांनी सांगितलं.

- Advertisement -

अशा प्रकारचे अनेक गुन्हे महाराष्ट्रात घडत आहेत. विरोधकांनाही विरोधकांना ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातूनही ब्लॅकमेल केलं जातंय, यावरही लक्ष घाला. भाजप आमदार आणि उपमुख्यमंत्र्याचं खास राहुल कूल यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी पुरावे देऊनही देवेंद्र फडणवीस काही बोलत नाही. या राज्याला मुख्यमंत्री नाहीच आहे. या राज्याला मख्खमंत्री आहे. मख्खपणे सारं काही चाललेलं आहे. मुख्यमंत्री केवळ ४० आमदारांना एकत्र ठेवण्याचं काम करतात. बाकी काही करत नाहीत. सगळी सुत्र उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टार्गेट केलंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -