घरमुंबईव्यक्तिगत पातळीवर झाली चर्चा - संजय राऊत

व्यक्तिगत पातळीवर झाली चर्चा – संजय राऊत

Subscribe

संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र या उधाण आलेल्या चर्चेला पुर्ण विराम मिळाला आहे.

अजित पवार यांच्या राजीनामा देण्याच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे एकमेव असणाऱ्या सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. संजय राऊत हे शरद पवारांना भेटण्यासाठी त्यांच्या मुंबईतील सिल्वर निवासस्थानी पोहचले होते. संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र या उधाण आलेल्या चर्चेला पुर्ण विराम मिळाला आहे. ‘मी व्यक्तिगत पातळीवर चर्चा करण्यासाठी गेलो होतो.’, असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.


हेही वाचा- अजित पवारांनी डिप्रेशनमध्ये दिला राजीनामा, जितेंद्र आव्हाडांचं धक्कादायक विधान

शुक्रवारी संध्याकाळी अजित पवार यांनी आपल्या आमदार या पदाचा अचानक राजीनामा दिल्याने संपुर्ण महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलट- सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांनी असा अचानक तडकाफडकी राजीनामा का दिला हे कारण जाणून घेण्याकरिता संपुर्ण महाराष्ट्र उत्सुक आहे. काही क्षणात राजीनामा का दिला याचे कारण स्पष्ट होणार आहे. सध्या वाय. बी चव्हाण सेंटरमधल्या पत्रकार परिषदेत ते त्यांची भूमिका स्पष्ट करत आहे.

- Advertisement -

आता अजित पवार काय बोलणार? त्यांची पुढील भूमिका नेमकी कशी असणार? याची उत्सुकता वाढलेली असतानाच शरद पवार यांच्या भेटीला शिवसेना खासदार संजय राऊत पोहचले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले.


LIVE UPDATE : राजीनाम्यानंतर अजित पवारांची पहिली पत्रकार परिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -