घरमुंबईअजित पवारांनी डिप्रेशनमध्ये दिला राजीनामा, जितेंद्र आव्हाडांचं धक्कादायक विधान

अजित पवारांनी डिप्रेशनमध्ये दिला राजीनामा, जितेंद्र आव्हाडांचं धक्कादायक विधान

Subscribe

भाजपचं गणित फक्त व्यक्तीद्वेष आहे. अजित पवार नावाचा मोठा नेता कधीतरी पुन्हा उठून येईल याचं भिती त्यांना आहे. अजित पवारांना असं वाटू लागलं होतं की माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होत आहे. विशेषत: काकांना म्हणजेच शरद पवारांना त्रास होत आहे. म्हणून त्यांनी त्या वैफल्यग्रस्ततेतून किंबगहुना डिप्रेशनमध्ये राजीनामा दिला आहे. शरद पवारांचं नाव ईडीने चार्जशीटमध्ये घेतलं, याचा त्यांना मनस्ताप झाला. म्हणून अजित पवारांनी राजीनामा दिला, असं धक्कादायक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. अजित पवार एक संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यांना शरद पवारांना त्रास झाल्याचं सहन झालं नाही, असंही ते म्हणाले.

‘सर्वांचे आभार’

शरद पवारांचं नाव ईडीने चार्ज शीटमध्ये घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि नेतेमंडलींनी शुक्रवारी ईडी कार्याल्याच्या परिसरात जमून आपला निषेध नोंदवला. दरम्यान, शरद पवारांच्या पाठिशी उभ्या राहणाऱ्या सर्वांचे जितेंद्र आव्हाड यांनी आभार मानले आहेत. ‘राहुल गांधी, प्रकाश आंबेडकर, एकनाथ खडसे, संजय राऊत, अण्णा हजारे या नेतेमंडळींनी शरद पवारांना पाठिंबा दिला, त्याबद्दल पक्षाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो’, असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -