घरमुंबईअल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या वयोवृद्धासह दोघांना अटक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या वयोवृद्धासह दोघांना अटक

Subscribe

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या वयोवृद्धासह दोघांना अटक करण्यात आली आहे.

शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन करुन त्यांचा विनयभंग केल्याची घटना विलेपार्ले आणि शीव परिसरात घडली आहे. याप्रकरणी विलेपार्ले आणि वडाळा टीटी पोलिसांनी विनयभंगासह बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून एका ८३ वर्षांच्या वयोवृद्धासह दोघांना अटक केली आहे.

विलेपार्ले आणि शीव येथील घटना

सुशील चांदोरकर हा शीव परिसरात राहत असून तो इलेक्ट्रीशियन म्हणून काम करतो. मंगळवारी सायंकाळी त्याने एका अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील संभाषण करुन तिच्याशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. काही वेळाने तिचे पालक शॉपिंग करुन घरी आले असता ही मुलगी रडताना त्यांना दिसून आली. त्यानंतर त्यांनी तिची विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. या घटनेनंतर त्यांनी वडाळा टीटी पोलिसांत सुशीलविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीला बुधवारी विशेष सेशन कोर्टात हजर केले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र भोबे यांनी सांगितले. तर दुसरी घटना विलेपार्ले परिसरात घडली असून एका पाच वर्षांच्या मुलीला घरी आणून तिच्याशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग करण्यात आला. या मुलीकडून हा प्रकार तिच्या पालकांना समजताच त्यांनी ८३ वर्षांच्या वयोवृद्धाविरोधात पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच आरोपी वयोवृद्धाला पोलिसांनी अटक केली असून त्याला दिडोंशी विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – किळसवाणा प्रकार: ९ वर्षीय मुलीचा रिक्षाचालकाकडून लैंगिक छळ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -