घरमुंबईधनगर समाजाच्या मागण्यांसाठी आज सह्याद्रीवर मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक

धनगर समाजाच्या मागण्यांसाठी आज सह्याद्रीवर मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक

Subscribe

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली असून त्यांनी बैठक आज, शनिवारी सह्याद्रीवर संध्याकाळी ४ वाजता पार पडणार आहे.

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली असून त्यांनी बैठक आज, शनिवारी सह्याद्रीवर संध्याकाळी ४ वाजता पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महादेव जानकर, पंकजा मुंडे, चंद्रकात पाटील, राम शिंदे आदी मंत्री उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये धनगर आरक्षण तसेच टीसच्या अहवालावर चर्चा होणार आहे. धनगर समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली असून या समितीची ही पहिली बैठक आहे. याबाबतची माहिती काल चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्याचबरोबर धनगर समाजाच्या आंदोलनात सहभागींवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचेदेखील महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

धनगर समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून त्याबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी गुरुवारी आंदोलकांना भेटून सांगितले होते. त्याच पार्श्वभूमीवर ही समिती स्थापन झाली असल्याचे त्यांनी सांगितले. या समितीमध्ये विविध विभागाचे मंत्री, सचिव यांचा सहभाग आहे. धनगर समाजाला विविध सुविधा देण्यासंदर्भात या उपसमितीमध्ये निर्णय होणार आहेत.

- Advertisement -

सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्याबाई होळकर नाव देण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत आली असून येत्या मंत्रीमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब होऊन निर्णय होणार आहे. त्यानंतर लवकरच राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे वंशज व राज्यातील मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे हे सोलापूर येथे जाऊन विद्यापाठीचे नामकरण करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -