घरमुंबईधनगर समाजाचा मोर्चा सानपाड्याजवळ रोखला

धनगर समाजाचा मोर्चा सानपाड्याजवळ रोखला

Subscribe

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी महाड चवदार तळ्यापासून मुंबई विधानभवनाकडे निघालेल्या हजारो मोर्चेकर्‍यांना बुधवारी नवी मुंबई पोलिसांनी पनवेलमध्ये रोखले. त्यानंतर गुरुवारी सानपाडा येथील दत्तमंदिरात मोर्चा पुढे नेण्यासाठी काही मोर्चेकरी जमले असता पोलिसांनी त्यांनाही त्या ठिकाणी रोखले. या मोर्चात राज्यभरातील धनगर समुदायातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा मुंबई-गोवा महामार्गासह सायन-पनवेल महामार्गावर होता.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी समाजाच्यावतीने शेळ्या-मेंढ्यांसह विधानभवनावर मोर्चा काढण्यात येत आहे. महाड येथून सुरू झालेला हा मोर्चा पनवेलच्या कळंबोलीत दाखल होताच समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

- Advertisement -

आदिवासी वर्गात आरक्षण मिळावे, यासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समाजाचा महाडहून निघालेल्या मोर्चा बुधवारी कळंबोलीमध्ये दाखल झाला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची अडवणूक केली, तसेच धनगर समाजाचे समन्वयक पडळकर आणि जानकर यांच्यासह अनेक समन्वयकांना ताब्यात घेतले, तर गुरुवारी सकाळी सानपाडामधील दत्तमंदिरात आंदोलक एकत्र आले असता त्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात झाला आणि त्यांनाही त्याच ठिकाणी रोखण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -