घरमुंबईकाँग्रेस,राष्ट्रवादी सह शिवसेनेलाही हवी स्प्ष्टता-उध्दव ठाकरे

काँग्रेस,राष्ट्रवादी सह शिवसेनेलाही हवी स्प्ष्टता-उध्दव ठाकरे

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा करण्यापूर्वीच आपली भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केल्यानतंर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनीहीआपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस-राष्ट्रवादीला स्पष्टता हवी होती, तशीच शिवसेनेलाही हवी होती,असे स्पष्ट करत ठाकरे यांनी राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी वेळ हवी होती. त्यासाठी वेळ वाढवून मागितला होता, पण त्यांनी वेळ दिला नाही. त्यामुळे कॉग्रेस, राष्ट्वादी काँग्रेससह तिन्ही पक्षांचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम तयार करून सत्ता स्थापनेचा विचार केला जाईल,असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेच्या सर्व आमदारांसोबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बैठक घेतल्यानंतर, वांद्य्रातील दि रिट्ीट या हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत बोलतांना हे स्पष्ट करत उध्दव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही टिका केली. भाजपची वेळ संपण्यापुर्वी आम्हाला त्यांच्या वेळेत वेळ देण्यात आली. त्यांनी दिलेल्या त्या पत्रात असे म्हटले होते की, तुम्ही दावा करू इच्छीत असाल तर आम्हाला २४ तासांत आमदारांच्या नावासह सहीचं पत्र द्या. पण सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता मुदत संपल्यानंतर आम्ही राज्यपालांना भेटुन हिच विनंती केली होती कि आम्ही सत्ता स्थापन करू इच्छीतो आणि तो आमचा दावा आज सुद्धा आहे. त्यासाठी ४८ मुदतवाढ देण्याची मागणी केली. पण दयावान राज्यपाल म्हणाले,४८ तास नाही तर ६ महिने देतो, त्यांचे गणित मला अजून समजलेले नसल्याचे सांगत ठाकरे यांनी खंत व्यक्त केली.

- Advertisement -

काल आम्ही पहिल्यांदाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला संपर्क साधला. आमचा मित्रपक्ष आम्ही भाजपपेक्षा आघाडीशी संपर्कात आहोत, असे म्हणत होते, त्यांना हे उत्तर असल्याचेही सांगितले. काल शिवसेनेने अधिकृतरित्या कॉग्रेसला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा मागितला असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादीला स्पष्टता हवी होती, तशीच स्पष्टता शिवसेनेलाही हवी होती. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी वेळ हवी होती,असे ते म्हणाले.
आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसु आणि कॉमन मिनिमम प्रोग्रॅम ठरवू. आम्ही ३० वर्ष एकत्र असताना वेगळ्या विचार धारेचे पक्ष एकत्र कसे आले असा प्रश्न विचारला जातो. मग मेहबुबा मुफ्ती आणि भाजप, नितीश कुमार आणि भाजप, चंद्राबाबू आणि भाजप एकत्र कसे आले ते मी मागवले आहे. याचाही अभ्यास मी करत आहे.त्यामुळे आम्ही कसे एकत्र येऊ हे ठरवू,असेही त्यांनी सांगितले.

भाजपने आम्हाला नवीन दिशा दाखवली

मुख्यमंत्री पदाबाबत भाजपने ठरवले होते किंवा आमच्यात ठरले होते. पण मला खोटे ठरवल्यामुळे संताप आला. त्यांनी मला काही लालच दाखवली म्हणून त्यांच्या मागे लागलो असे नाही.आघाडी सोबत जाण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी शुभेच्छा दिल्या. एक चांगला मित्र म्हणुन त्यांचा सल्ला ऐकतो. मित्र पक्षाकडून संपर्क करून वेगवेगळ्या गोष्टी ठरवल्या जणार असतील तर काही अर्थ नाही.हिंदूत्व आमची विचार धारा आहे. पण नुसते वचन द्यायचेआणि ते पाळायचं नाही. काही दिवस थांबुन काय होतय ते पाहू. मित्रांनी नवीन दिशा दाखवली आहे, त्या नवीन दिशेने जावू असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -