घरमुंबई'ऑगस्टा वेस्टलॅंड घोटाळ्याच्या बाचाबाचीत राफेलचा विसर पडणार नाही'

‘ऑगस्टा वेस्टलॅंड घोटाळ्याच्या बाचाबाचीत राफेलचा विसर पडणार नाही’

Subscribe

ऑगस्टा वेस्टलँड प्रकणावर सुरु असलेल्या बाचाबाचीवर शिवसेनेने भाजपवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहेत. ऑगस्टा वेस्टलॅंड घोटाळ्याच्या बाचाबाचीमध्ये लोक राफेलच्या घोटाळ्याला विसरणार नाहीत, असा टोला शिवसेनेने 'सामना' मुखपत्रातून लगावला आहे.

सध्या ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण चांगलेच गाजताना दिसत आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयात दिलेल्या माहितीनंतर भाजप काँग्रेसवर ताशेरे ओढत आहे. भाजपकडून काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी दलाल ख्रिस्तियन मिशेल याने ईडीच्या चौकशीत सोनिया गांधी यांचे नाव घेतले आहे. त्याचबरोबर या तपासात एका इटालियन महिलेचा मुलगा पंतप्रधान बनेल, असे देखील नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपकडून काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या घोटाळ्यामध्ये काँग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे यावर काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे, असे भाजपकडून म्हटले जात आहे. आता याच मुद्यावर शिवसेनेने भाजपाला पुन्हा एकदा चिमटा मारला आहे. ऑगस्टा वेस्टलॅंड घोटाळ्याच्या बाचाबाचीमध्ये लोक राफेलच्या घोटाळ्याला विसरणार नाहीत, असा टोला शिवसेनेने ‘सामना’ मुखपत्रातून लगावला आहे.

‘सोनिया गांधींचे नाव घेण्यासाठी मिशेलवर दबाव’

ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणातील मुख्य आरोपी मिशेलला दुबई येथून अटकरण्यात आले होते. त्यावेळी देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक-दोन वेळा प्रचारसभेमध्ये मिशेलचे नाव घेतले. मिशेलवर सोनिया गांधींचे नाव घेण्याचा दबाव आणला जात असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. याविषयी शिवसेनेने सविस्त असे म्हटले आहे की, “मिशेल की फिशेल आहे त्यास दुबईतून ताब्यात घेतले व दिल्लीस आणले तेव्हा पाच राज्यांतील निवडणुकांचा प्रचार तापला होता व भाजपच्या बुडास आग लागली होती. पंतप्रधान मोदी यांनी एक-दोन मोठ्या प्रचारसभांत मिशेलचा उल्लेख करून सांगितले की, ‘आता बघा काय स्फोट होतात ते. ब्रिटनचा दलाल आणला आहे. आता मी कुणालाच सोडणार नाही.’ या सगळ्यांचा अर्थ आता लागत आहे. मिशेल हा सोनिया गांधींचे व त्यांच्या मुलाचे नाव घेणारच हे पक्के होते व तसे संकेत पंतप्रधानांना होते. मिशेलची चौकशी सुरू होण्याआधीच मोदी यांनी गांधींकडे बोट दाखवून तपासाची दिशा स्पष्ट केली हे जरा गमतीचे वाटते”.

- Advertisement -

हेही वाचा – ‘भाजप – शिवसेना म्हणजे ‘वरून तमाशा, आतून कीर्तन’!

‘लोक राफेल विसरणार नाहीत’

ऑगस्टा वेस्टलॅंड घोटाळ्यासोबतच लोक राफेल कराराला विसरणार नाहीत, असे देखील शिवसेनेने म्हटले आहे. याविषयी बोलताना शिवसेना म्हणते की, “ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात मिशेलने श्रीमती गांधी व त्यांच्या काँग्रेसचे नाव घेतले म्हणून राफेल विमान घोटाळा लोक विसरतील असे कुणी समजू नये. मिशेलने जसे सोनिया गांधींचे नाव घेतल्याचा दावा आहे तसे राफेलप्रकरणी पंतप्रधान मोदी व अनिल अंबानींचे नाव थेट फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी घेतले व हा घोटाळा किमान काही हजार कोटींचा आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात 432 कोटी रुपयांची दलाली वाटली. राफेल प्रकरणात विमानांच्या किमती वाढवून घेतल्या व त्यात एका उद्योगपतीचे कल्याण झाले. म्हणजे राफेल विरुद्ध ऑगस्टा वेस्टलॅण्ड अशी ही लढाई आहे”.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -