घरदेश-विदेशचंद्राबाबू नायडूंनी मोदींना दिले चर्चेचे आव्हान

चंद्राबाबू नायडूंनी मोदींना दिले चर्चेचे आव्हान

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी माध्यमांना मुलाखत दिली. या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मोदींनी आपल्यासोबत आर्थिक वृद्धी विषयी चर्चा करावी, असे आव्हान केले आहे.

मंगळवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना मुलाखत दिली. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत सर्वात महत्त्वाची ठरेल असे म्हटले जात होते. या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी गेल्या साडे चार वर्षभरातील भाजप सरकारच्या कामकाजाविषयी माहिती दिली. दरम्यान, नरेद्र मोदी यांनी या साडे चार वर्षांमध्ये ९२ विदेश दौरे केले. या ९२ विदेश दौऱ्यांना तब्बल २०२१ कोटी रुपये खर्च झाले. फक्त विदेश दौऱ्यासाठी एवढे पैसे खर्च झाल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. परंतु, हे विदेश दौरे करणे महत्त्वाचे असल्याचे मोदींनी मुलाखतीत म्हटले आहे. त्यांच्या या मुलाखतीवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना मोदींना देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्यांच्यासोबत चर्चा करण्याचे आव्हान केले आहे.

हेही वाचा – आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंविरोधात अटक वॉरंट जारी

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले चंद्राबाबू नायडू?

चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदी यांना आव्हान केले आहे की, गेल्या साडे चार वर्षामध्ये देशाला कुठल्याप्रकारचा आर्थिक फायदा झाला याविषयी मोदींनी माझ्यासोबत चर्चा करावी. ते म्हणाले की, यूपीए सरकारच्या काळात देशात आर्थिक दर चांगला नव्हताच. पण, मोदी सरकारच्या काळात आर्थिक वृद्धी त्याहीपेक्षा कमी झाली. जीएसटी आणि नोटबंदीमुळे आर्थिक वाढ झाली का, असा सवाल त्यांनी लगावला आहे. मोदी सरकारच्या निर्णयांमुळे देशाची आर्थिक प्रणाली उद्धवस्त झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आर्थिक मुद्यांवर मोदींनी माझ्याशी चर्चा करावी, असे आव्हान त्यांनी केले आहे.


हेही वाचा – ‘CBI’ला आंध्रप्रदेशात बंदी; नायडूंचा दे धक्का

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -