घरदेश-विदेशVIDEO: शबरीमाला मंदिराची ऐतिहासिक परंपरा मोडली

VIDEO: शबरीमाला मंदिराची ऐतिहासिक परंपरा मोडली

Subscribe

३५ ते ४० वयोगटातील दोन महिलांनी आज सकाळी मंदिरात प्रवेश केला. या महिलांनी मध्यरात्रीपासून मंदिराच्या दिशेने येण्यास सुरुवात केली होती आणि जवळपास ३.४५ मिनिटाने त्या मंदिरात पोहचल्या. त्यानंतर त्यांनी मंदिरात प्रवेश करत अय्यपाचे दर्शन घेतले आणि निघून आल्या.

केरळच्या प्रसिध्द शबरीमाला मंदिरची शेकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा तुटली आहे. शबरीमाला मंदिरामध्य दोन महिलांनी प्रवेश केला आहे. या महिलांनी असा दावा केला आहे की, त्यांनी मदिराच्या गाभाऱ्यात जाऊन अय्यपाचे दर्शन घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे ५० पेक्षा कमी वय असलेल्या दोन महिलांनी शबरीमाला मंदिरात प्रवेश करुन दर्शन घेतले. शबरीमाला मंदिरामध्ये ५० पेक्षा कमी वयोगटातील महिलांनी प्रवेश करणे हे इतिहासात पहिल्यांदाच झाले आहे. शबरीमाला मंदिरामध्ये १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेशाला बंदी आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. तरी देखील मंदिरामध्ये महिला प्रवेशाला विरोध केला जात आहे.

- Advertisement -

अखेर परंपरा मोडली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ३५ ते ४० वयोगटातील दोन महिलांनी आज सकाळी मंदिरात प्रवेश केला. या महिलांनी मध्यरात्रीपासून मंदिराच्या दिशेने येण्यास सुरुवात केली होती आणि जवळपास ३.४५ मिनिटाने त्या मंदिरात पोहचल्या. त्यानंतर त्यांनी मंदिरात प्रवेश करत अय्यपाचे दर्शन घेतले आणि निघून आल्या. असे सांगितले जात आहे की, या महिलांसोबत पोलिसांची तुकडी देखील होती. पोलीस वर्दी आणि साध्या कपड्यांमध्ये होते. यासंदर्भातला एक व्हिडिओ एएनआयने जारी केला आहे. त्यामध्ये दोन महिला महिला मंदिरात प्रवेश करताना दिसत आहेत. यामधील एका महिलेचे नाव बिंदू तर दुसरीचे नाव कनकदुर्गा असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

आधी महिला प्रवेश नाकारला

शबरीमाला मंदिरामध्ये २४ डिसेंबरला तामिळनाडूच्या ११ महिलांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र मंदिर परिसरामध्ये त्यांना आंदोलनकर्त्यांनी अडवले. आंदोलनकर्त्यांच्या विरोधामुळे त्यांना परत जावे लागले. त्यावेळी पोलिसांनी २४ पेक्षा अधिक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते. याआधी देखील शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा अनेक महिलांनी प्रयत्न केला होता. मात्र त्यांना विरोध करण्यात आला होता. महाराष्ट्रातील भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या देखील शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्यांना एअरपोर्टवरच अडवण्यात आले होते.

कोर्टाने दिले होते आदेश 

२८ सप्टेंबर २०१८ रोजी सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला होता. केरळच्या शबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यात यावा असे आदेश कोर्टाने दिले होते. सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात स्पष्ट सांगितले होते की, शबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोग्टातील महिला प्रवेश करु शकतात. तसंच आपल्या संस्कृतीमध्ये महिलांना आदरणीय स्थान आहे. महिलांची देवीप्रमाणे पूजा केली जाते असे असताना महिलांना मंदिर प्रवेशापासून रोखले जाते. हे योग्य नसल्याचे कोर्टाने सांगितले होते.

हेही वाचा – 

शबरीमाला मंदिरात ४ तृतीयपंथीयांनी केली पूजा

शबरीमाला मंदिर प्रवेशापासून २ महिलांना रोखलं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -