घरमुंबईनवरात्रोत्सवासाठी श्री महालक्ष्मी मंदिर सज्ज

नवरात्रोत्सवासाठी श्री महालक्ष्मी मंदिर सज्ज

Subscribe

कडेकोट बंदोबस्त - सीसीटीव्हींची नजर

देश विदेशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान व मुंबईकरांचे आराध्यदैवत असलेल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाची तयारी जोरात सूरू असून नवरात्रीच्या दर दिवशी साधारणतः लाखो भाविक दर्शनासाठी येतात. ललिता पंचमी, अष्टमी व सुट्टीच्या दिवशी भाविकांची संख्या अडीच लाखांपर्यंत जाते. वृद्ध, अपंग व गर्भवती स्त्रियांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था केलेली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व प्रकारची तयारी मंदिर व्यवस्थापनाने व पोलीस प्रशासनाने केलेली आहे, असे महालक्ष्मी मंदिराचे मुख्य व्यवस्थापक शरदचंद्र पाध्ये यांनी सांगितले.

महालक्ष्मी शारदीय नवरात्रौत्सव रविवार, 29 सप्टेंबर, 2019 रोजी सुरू होत असून मंदिरामध्ये सुर्योदयापूर्वी सकाळी 5.00 वाजता घटस्थापना होऊन त्यानंतर ध्वजारोहण सकाळी 6.30 वा. व आरती सकाळी ठिक 7.00 वा. होईल. बुधवार, 2 ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी पुजन असून त्या दिवशी उपांग ललिता व्रत आहे. रविवार, 6 ऑक्टोबर रोजी अश्विन शुद्ध अष्टमी-दुर्गा अष्टमी असून अष्टमी हवनास सकाळी 7.30 वाजता प्रारंभ होऊन पूर्णाहुती सकाळी 11.00 वाजता व त्यानंतर आरती सुमारे 12.30 वाजता संपन्न होईल.

- Advertisement -

मंगळवार, 08 ऑक्टोबर रोजी विजयादशमी असून नवरात्रीतील इतर दिवशी आरती पहाटे 5.30 वा. संध्याकाळी 6.30 वा. धुपारती व 7.30 वा. मोठी आरती होईल. हे सर्व धार्मिक कार्यक्रम मंदिराचे मुख्य पुजारी प्रकाश साधले, सुयोग कुलकर्णी, रमाकांत भोळे, अरूण वीरकर, सुरेश जोशी, केतन सोहनी, महेश काजरेकर यांच्यासह 24 पुजार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली होतील.

नवरात्रोत्सवामध्ये मंदिर सकाळी 5.00 वा उघडून रात्रौ 10.00 वा. बंद करण्यात येईल. मंदिराचे व्यवस्थापक भालचंद्र वालावलकर यांनी मंदिरामध्ये येताना भाविकांनी पुजेचे साहित्य प्लास्टिकची थाळी किंवा लास्टिक पिशवीतून न आणता कापडी पिशवीचा व छोट्या टोपल्यांचा वापर करावा असे कळविले आहे. तसेच सुुरक्षिततेच्या दृष्टीने नवरात्रीमध्ये भाविकांनी आपल्या बरोबर मोठ्या अवजड बॅगा आणू नयेत, असे व्यवस्थापनातर्फे व्यवस्थापक भालचंद्र वालावलकर आणि गावदेवी पोलीस स्टेशनतर्फे कळविले आहे.

- Advertisement -

मुंबादेवी मंदिरामध्ये आश्विन नवरात्रोत्सव

श्री मुंबादेवी मंदिरास 355 वर्षे व मंदिर विश्वस्त निधीला 130 वर्षे पूर्ण झाली असून, मुंबादेवी मंदिरामध्ये आश्विन नवरात्रोत्सवाचे आयोजन रविवार, 29 सप्टेंबर ते मंगळवार, 08 ऑक्टोबर, 2019 पर्यंत आयोजित केलेले आहे.

रविवार,29 सप्टेंबर रोजी सकाळी 6.00 ते 6.30 च्या दरम्यान घटस्थापना होणार आहे. या उत्सव काळामध्ये सकाळी 5.30 वाजता मंगला आरती, सकाळी 9.30 वाजता मुख्य आरती, नैवेद्य आरती सकाळी 11.30 वाजता, धुपारती सायंकाळी 6.30 वाजता, रात्रीची मुख्य आरती 8.00 वाजता आणि शयन आरती 10.45 वाजता होणार आहे, असे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी कळविले आहे.

बुधवार, 2 ऑक्टोबर रोजी महापंचमीनिमित्त सायंकाळी 6.00 ते 6.30 च्या दरम्यान दीपोत्सव आयोजित केला आहे. रविवार, 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 5.00 वाजता नवमीचे हवन (श्री चंडी महायज्ञ)चे आयोजन केले असून त्याची पुर्णाहूती दुपारी 12.00 ते 12.30 च्या दरम्यान होणार आहे. मंगळवार, 08 ऑक्टोबर रोजी पूर्ण दिवस दसरा संमेलन आहे. नवरात्रीच्या काळामध्ये सकाळी 5.30 वाजता मंदिर उघडणार असून रात्रौ 11.00 वाजता मंदिर बंद होईल.

या उत्सव काळामध्ये भक्तांच्या सोयीसाठी मोठा मंडप उभारला असून पिण्याच्या पाण्याची व सरबताची विनामूल्य सोय केलेली आहे. तसेच मंदिरामध्ये मध्यवर्ती वातानुकूलित व्यवस्था केलेली आहे. तरी सर्व भक्तगणांनी नवरात्र उत्सव कालावधीत शांततेने मुंबादेवी मातेचे दर्शन घेण्याचे आवाहन मंदिराचे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी केलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -