घरलाईफस्टाईलआजीबाईचा बटवा!

आजीबाईचा बटवा!

Subscribe

घरचा वैद्य

सध्याच्या धावपळीत अनेकांना काहींना काही व्याधी असतात. मात्र, डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु, काही आजारांवर घरच्या घरी उपाय केल्यास त्या व्याधी दूर होण्यास मदत होते.

केसगळती

- Advertisement -

केसगळती होत असल्यास खोबरेल तेल एक रामबाण उपाय आहे. यासाठी पाव लिटर खोबरेल तेस, तुळशीची २ पाने, जास्वंदाच्या झाडाची २ पाने (फुलाची नव्हे), १ चमचा ब्राह्मी पावडर, १ चमचा आवळा पावडर आणि मधमाश्यांच्या पोळ्याचे मेण १५ ते २० ग्रॅम एकत्र करुन मंद आचेवर शिजवावे. त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर (काळे होऊ देऊ नये) ते गाळून घ्यावे. या तेलाने रोज रात्री १० मिनिटे केसांच्या मुळांना मालिश करावे. सुरुवातीला सलग आठ दिवस हा प्रयोग रोज करावा. स्त्रियांनी पुढील दोन महिन्यांपर्यंत आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करावा. पुरुषांनी रोज करायला हरकत नाही. स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी. यामुळे केसगळती थांबते.

- Advertisement -

डोळ्यांसाठी उपाय

अनेकदा डोळे दुखणे. सतत मोबाईलच्या वापरामुळे दृष्टी कमी होते. अशावेळी विड्याची पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून, स्वच्छ हाताने चुरगाळावे आणि त्या रसाचा एक-एक थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडावेत. रोज हा प्रयोग केल्यास दृष्टी चांगली राहते. तसेच आयुष्यभर चष्मा लागत नाही. त्याचप्रमाणे मोतीबिंदू इत्यादी नेत्ररोग देखील होत नाहीत.

नाकातील हाड वाढल्यास

अनेकांना नाकातील हाड वाढल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. अशावेळी ५ रिठे आणि १ चमचा सुंठ पावडर ३ कप पाण्यात अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळावे. नंतर हे पाणी वस्त्रगाळ करुन घ्यावे. कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीत भरुन ठेवावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे २-२ थेंब सोडावेत. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास नाकातील वाढलेले हाड कायमस्वरुपी पूर्ववत होण्यास मदत होते.

सर्दीचा त्रास

बऱ्याच जणांना बाराही महिने सर्दी असते. तर काहींना थंड खाल्ल्यास सर्दीचा त्रास होतो. अशावेळी दोन्ही हाताचे अंगठे मुठीत ठेवून त्या मुठी विरुद्ध हाताच्या काखेमध्ये २ मिनिटे दाबून ठेवल्यास सर्दीचा त्रास कमी होतो.

वजन कमी करण्यासाठी

सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीला स्लिम अॅन्ड ड्रिम राहायचे असते. मात्र, वाढलेले वजन कमी कसे करावे असा प्रश्न पडतो. अशावेळी ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे आणि १ लिटर ताकात २ लिटर पाणी या प्रमाणात हे ताक एक दिवसाआड रोज प्यावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

हृदय मजबूत होण्यासाठी

हृदय मजबूत होण्यासाठी रोज सकाळी नियमितपणे लसणाची एक पाकळी खावी. यामुळे ब्लॉकेजेस निघून जातात.

कफ वाढल्यास किंवा दम लागत असल्यास उपाय

कांदा किसून त्याचा रस काढावा. हा रस कापडातून गाळून घ्यावा आणि एक मोठा चमचा भरुन प्यावा. त्यानंतर अर्ध्या मिनिटाने गरम पाणी प्यावे. यामुळे १० मिनिटात सर्व कफ निघून जातो. तसेच श्वास मोकळा होतो आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. त्यामुळे दम देखील लागत नाही.

(टीप – हे घरगुती उपाय आपल्या जबाबदारीवर अथवा वैद्यकीय सल्ला घेऊन करावेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -