घरमुंबईश्रीनिवास मंगल महोत्सवात बॅनरबाजीवर चर्चा

श्रीनिवास मंगल महोत्सवात बॅनरबाजीवर चर्चा

Subscribe

डोंबिवलीत सध्या श्रीनिवास मंगल महोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र सध्या सोहळ्यापेक्षा शहरात सुरू असलेल्या बॅनरबाजी मोठी चर्चा सुरू आहे.

डोंबिवलीत सध्या श्रीनिवास मंगल महोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. १ डिसेंबरला डोंबिवलीच्या सावळाराम क्रीडा संकुलात हा भव्य सोहळा होणार असून त्यासाठी शहरात जोरदार वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे. मात्र सध्या सोहळ्यापेक्षा शहरात सुरू असलेल्या बॅनरबाजी मोठी चर्चा सुरू आहे. डोंबिवलीत येत्या १ डिसेंबर रोजी तिरुपती बालाजीचं लग्न होणार आहे. सावळाराम क्रीडा संकुलात होणाऱ्या या भव्य दिव्य कार्यक्रमाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. या लग्नसोहळ्याच्या आयोजनाची ‘जबाबदारी’ शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी उचलली आहे. शिवाय या महोत्सवाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी शिवसेनेनं शहरात प्रचंड बॅनरबाजी केली आहे. मात्र या सगळ्यात अचानक गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही याच कार्यक्रमाचे बॅनर लावत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळं कार्यक्रम नेमका आहे तरी कुणाचा असा प्रश्न डोंबिवलीकरांना पडलाय. तर दुसरीकडे शिवसैनिकांनी मात्र यावरून भाजपवर चांगलंच तोंडसुख घेतलंय.

येणाऱ्या काळात देशात आणि राज्यात निवडणुका आहेत. त्यामुळे साहजिकच अशा राजकीय कुरघोड्या वाढणार आहेत. मात्र कार्यक्रमाचा ‘भार’ उचलूनही क्रेडिट जर दुसराच घेऊन जात असेल, तर सैनिकांची चिडचिड तर होणारच.राजकारण बाजूला ठेवून एक धार्मिक सोहळा आम्ही आयोजित केला आहे. यात कोणतेही राजकारण नाही. धार्मिक कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याचा अधिकार हा सर्वांनाच आहे. – आ. सुभाष भोईर, शिवसेना

- Advertisement -

साईधाम मंदिराचे भाई ठाकूर व इतर मंडळी मला येऊन भेटली व माझ्या मतदारसंघातील साऊथ इंडियन सेल, मंदीर संस्था व इतर धार्मिक संस्थांशी संपर्क साधून देण्याची विनंती केली. त्यानंतर मी सर्व संस्थाची एक बैठक आयोजित केली होती. यावेळी आमदार भोईर हे सुद्धा उपस्थित होते. उत्सवाचे महत्व सर्व संस्थाना सांगत यात सहभागी होण्याचे आवाहन मी केले. कार्यक्रम अधिक लोकांपर्यंत पोहचावा म्हणून सहभागी संस्थांनी माझ्या मतदारसंघात मला बॅनर लावण्याचे आवाहन केले. यात कोणतेही राजकारण नसून हा हिंदुत्ववादाचा विषय आहे. – रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -