Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन वऱ्हाड निघालं जोधपुरला; देसी गर्लचा थाट न्यारा

वऱ्हाड निघालं जोधपुरला; देसी गर्लचा थाट न्यारा

Subscribe

मुंबईतील सर्व नियोजीत कार्यक्रम आटोपल्यानंतर आज लग्नाचं हे वऱ्हाड जोधपूरला रवाना झालं. यावेळी प्रियांका चोप्रा आणि तिच्या घरची मंडळी खास भारतीय वेशभूषेत दिसली.

व्हिडिओ सौजन्य- Viral Bhyani, Instagram

 

View this post on Instagram

 

Happy mamma #madhuchopra #priyankakishaadi @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 व्हिडिओ सौजन्य- Viral Bhyani, Instagram


प्रियांका-निकच्या लग्नाची रुपरेषा थोडक्यात…

- Advertisement -

येत्या २ डिसेंबरला प्रियांका आणि निक आपली लग्नगाठ बांधणार आहेत. त्यानंतर भारतीय आणि ख्रिश्चन अशा दोन पद्धतीने त्यांचं वेडिंग रिसेप्शन पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. ३० नोव्हेंबरपासून प्रियांका-निकच्या लग्न सोहळ्याला सुरुवात होणार आहे. सूत्रांनुसार, २९ नोव्हेंबर रोजी मेहंदी आणि संगीत समारंभ होणार असून ३० तारखेला कॉकटेल पार्टी दिली जाणार आहे. तर १ डिसेंबर रोजी हळद आणि २ तारखेला दोघांचं लग्न असा कार्यक्रम असणार आहे. आधी हिंदू पद्धतीने लग्न सोहळा होणार असून ३ डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने दोघं लग्न करणार आहेत. दोन्ही लग्न पद्धती एकाच सभागृहात होणार आहेत.

जोधपूर येथील उमैद भवन पॅलेसमध्ये प्रियांका आणि निकचा शाही विवाह सोहळा पार पडणार असून, या सोहळ्यासाठी उमैद भवनावर रोषणाई करण्यात आली आहे. आकर्षक सजावट आणि रोषणाईने सजलेल्या उमैद भवनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. उमैद भवनावर थ्री-डी लाईट्सची रोषणाई केल्यामुळे त्याला एखाद्या राजवाड्याचे स्वरुप आले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -