घरमुंबईमुंबई मेट्रो वनमध्ये सिंगल यूज प्लॅस्टिक बंदी लागू

मुंबई मेट्रो वनमध्ये सिंगल यूज प्लॅस्टिक बंदी लागू

Subscribe

राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर संचलित मुंबई मेट्रो वनमध्ये सिंगल यूज प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. १२ मेट्रो स्टेशनवरील अन्नपदार्थ आणि पेयांच्या दुकानांना प्लॅस्टिक बंदीबाबतची सूचना या पूर्वीच देण्यात आली असून, प्लॅस्टिकला पर्याय असलेल्या अन्य साहित्याचा वापर करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे आता मेट्रो स्टेशनवर कागदी कप, कापडी पिशव्या, कागदी पिशव्यांचा वापर सुरू झाला आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

‘हरित वचन आणि स्वच्छ भारत अभियानासाठी मुंबई मेट्रो वन कायमच समर्पित वृत्तीने काम करत आहे. पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी होणं आहे आमचं कर्तव्य आहे. नव्या नियमाचं पालन करण्याची सूचना मेट्रो स्टेशनवरील सर्व विक्रेत्यांना या पूर्वीच देण्यात आली होती. तसंच आमच्या प्रवाशांनाही सिंगल यूज प्लॅस्टिक न वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे,’ असे मुंबई मेट्रो वनच्या प्रवक्त्याने सांगितले.

मेट्रो स्टेशनच्या परिसरात परवानगी असलेल्या वस्तू

  • २०० मिली किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या बाटल्या
  • ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या आणि किमान दोन ग्रॅम वजनाचे प्लॅस्टिक साहित्य
  • नर्सरी, शेती, बागायतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या, घनकचरा वाहू शकणाऱ्या विघटनशील प्लॅस्टिक पिशव्या
  • एक किंवा दोन थर जाडीचे कागदी कार्टन पॅकेजिंग
  • किमान ५० मायक्रॉनपेक्षा जाड असलेल्या दुधासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या
  • शॅम्पू, चिप्स, तेल, चॉकलेट्ससाठी वापरले जाणारे विघटनशील प्लॅस्टिक
  • औषधे, वैद्यकीय साहित्याच्या पॅकेजिंगसाठीचे प्लॅस्टिक
  • कार्यालयीन किंवा शैक्षणिक उद्देश असलेली प्लॅस्टिकची उपकरणे

बंदी असलेल्या वस्तू

  • पिण्याच्या पाण्याच्या २०० मिलीपेक्षा कमी लहान बाटल्या
  • मिनरल वॉटरचा पाऊच
  • खरेदीसाठीच्या प्लॅस्टिक पिशव्या
  • एकदाच वापर होणाऱ्या प्लॅस्टिक किंवा थर्माकोलच्या वाट्या, ताटल्या, चमचे, ग्लास आदी…
  • विघटन न होणारे कोणतेही प्लॅस्टिक
  • सजावटीसाठीचे प्लॅस्टिक आणि थर्माकोल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -