घरमुंबईनववर्षाच्या स्वागतासाठी विशेष लोकल

नववर्षाच्या स्वागतासाठी विशेष लोकल

Subscribe

नववर्षाच्या स्वागतासाठी उपनगरांमधून सीएसएमटी परिसरात येणार्‍या प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत फिरता यावे यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मंगळवार ३१ डिसेंबरच्या रात्री ४ स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मेन लाईन आणि हार्बर मार्गावर प्रत्येकी २-२ गाड्या धावणार आहेत. या लोकल १२ डब्यांच्या असणार आहेत. डाऊन मार्गावर कल्याण ते सीएसएमटी दरम्यान रात्री १.३० वा तर पश्चिम मार्गावर कल्याण ते सीएसएमटी रात्री.१.३०वाजता लोकल चालविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर पनवेल ते सीएसएमटी ट्रेन रात्री १.३०वाजता आणि सीएसएमटी ते पनवेल ट्रेन रात्री १.३० वाजता सुटणार आहे. या लोकल धिम्या मार्गावर चालविण्यात येणार असल्यामुळे त्या सर्व स्थानकांवर थांबविण्यात येणार आहेत. या विशेष लोकलमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

बेस्टच्या जादा बसगाड्या
गेटवे ऑफ इंडिया,जुहू चौपाटी,गोराई बीच आणि शहरातील इतर समुद्र किनार्‍यांवर-चौपाट्यांवर रात्रीच्या वेळी येणार्‍या प्रवाशांच्या,पर्यटकांच्या सोयीसाठी बेस्टतर्फे मंगळवारी रात्री बसमार्ग क्र.७ मर्या,१११,११२,२०३,२३१,२४७ आणि २९४ वर रात्री एकूण २० एकमजली जादा बसेस धावणार आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठी डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौक,जुहू चौपाटी,गोराई बीच,चर्चगेट आणि सीएसएमटी या ठिकाणी वाहतूक अधिकारी,बसनिरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

- Advertisement -

पश्चिम रेल्वेवर सुध्दा स्पेशल लोकल
पश्चिम रेल्वेनेही चर्चगेट ते विरार दरम्यान आणि विरार ते चर्चगेटदरम्यान प्रत्येकी चार अशा एकूण आठ विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व विशेष लोकल परेच्या सर्व स्थानकांवर थांबतील. यामध्ये चर्चगेटवरून अनुक्रमे मध्यरात्री 1.15, 2, 2.30 आणि 3.25 वाजता एकूण चार विशेष लोकल विरारसाठी रवाना होतील. या विशेष लोकल विरारला अनुक्रमे मध्यरात्री 2.55, 3.40, 4.10 आणि 5.05 वाजता पोहचतील. याउलट विरारहून चार विशेष लोकल अनुक्रमे मध्यरात्री 12.15, 12.45, 1.40 आणि 3.05 वाजता सुटतील. या विशेष लोकल चर्चगेटला अनुक्रमे मध्यरात्री 1.52, 2.22, 3.17 आणि 4.41 वाजता पोहचतील. तरी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी विशेष लोकलची वेळ लक्षात घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -