घरमुंबईStock Market : शेअर बाजारासाठी आजचा दिवस ऐतिहासक; निफ्टी प्रथमच  22,186 अंकावर

Stock Market : शेअर बाजारासाठी आजचा दिवस ऐतिहासक; निफ्टी प्रथमच  22,186 अंकावर

Subscribe

शेअर बाजारात निफ्टी आयटी निर्देशांक वगळता सर्व निर्देशांक वाढीसह बंद झाले आहे. निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी ऑटो, स्मॉल कॅप, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या निर्देशांकात वाढ झाली आहे.

मुबंई : शेअर बाजाराने आज विक्रमी उच्चांक गाठला आहे. आठवड्याच्या पहिल्यात दिवशी शेअर बाजारासाठी ऐतिहासिक दिवस ठरला. आज शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये सर्वात उच्चांक गाठला आहे. आज शेअर बाजाराचा निफ्टीने प्रथम 22,186 अंकावर बंद झाला आहे तर, सेन्सेक्सही 281 अंकांच्या वाढीसह 72,708 वर बंद झाला.

आज शेअर बाजारात सर्वाधिक फार्मा, बँकिंग, ऑटो, ऊर्जा, हेल्थकेअर, तेल आणि एफएमसीजी या क्षेत्रातील वाढीसह बंद झाले तर कोल इंडिया, विप्रो, अँड टुब्रो, एलटीआय माइंड ट्री, एसबीआय लाइफ आणि एचडीएफसी लाइफ यांचा शेअरची आज घसरण झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : रवी राणांच्या ‘त्या’ दाव्यावर खैरे म्हणतात, उद्धव ठाकरे एकवचनी नेता

अशी आहे क्षेत्रीय निर्देशांची स्थिती

शेअर बाजारात निफ्टी आयटी निर्देशांक वगळता सर्व निर्देशांक वाढीसह बंद झाले आहे. निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी ऑटो, स्मॉल कॅप, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. सेन्सेक्स हा 30 शेअर्सपैकी 17 शेअर्स वाढी तर 13 शेअर्सच्या घसरणीसह बंद झाले आहे. तसेच निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 28 शेअर्स वाढी आणइ 22 शेअर्स घसरणीसह बंद झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Politics : विधानसभेपूर्वी ठाकरे शिंदेंचं नेतृत्व स्वीकारून मोदींना पाठिंबा देतील; अपक्ष आमदाराचा दावा

अदानी समूहाच्या 10 कंपन्यापैकी दोन सिमेंट कंपन्यांच्ये शेअर्समध्ये आज घसरण झाली असून अंबुजा सिमेंटचे शेअर्स आणि एसीसी लिमिटेड यांच्यात घसरणीसह शेअर बाजार बंद झाला आहे. सुला विनयार्डचे शेअर्स 7 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहे. यात स्टॉक 7.6 टक्के घसरून 570.60 च्या इंट्राडे नीचांकावर आला होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -