घरमुंबईसहा तास विद्यार्थी परीक्षा भवनाबाहेरच

सहा तास विद्यार्थी परीक्षा भवनाबाहेरच

Subscribe

मुंबई विद्यापीठ प्रशासनाने यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून लॉच्या अभ्यासक्रमासाठी ६०/४० ही प्रणाली अंमलात आणली आहे. या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध केला असून याविरोधात मंगळवारी कलिना कॅम्पसमध्ये आंदोलनाचा एल्गार विद्यार्थी संघटनांनी पुकारला होता.

मुंबई विद्यापीठ प्रशासनाने यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून लॉच्या अभ्यासक्रमासाठी ६०/४० ही प्रणाली अंमलात आणली आहे. या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध केला असून याविरोधात मंगळवारी कलिना कॅम्पसमध्ये आंदोलनाचा एल्गार विद्यार्थी संघटनांनी पुकारला होता. दुपारी अडीच वाजता सुरू झालेले हे आंदोलन रात्री साडे आठ वाजेपर्यंत सुरुच असल्याने परीक्षा भवनासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थी संघटनांचा या आक्रमक पवित्रा लक्षात घेता सुरक्षा अधिकार्‍यांची पंचाईत झाल्याचे चित्र रात्री विद्यापीठात दिसून आले.

मुंबई विद्यापीठाने गेल्या काही वर्षांपूर्वी श्रेयांक श्रेणी ही पध्दत सुरू केली आहे. या प्रणालीच्या अनुषंगाने विद्यापीठाने लॉ शाखेच्या परीक्षा पध्दतीत बदल करीत त्यांच्यासाठी ६०/४० ही पध्दत सुरू केली आहे. या परीक्षा पॅर्टनला स्टुंडट लॉ कौन्सिल आणि इतर विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शवित त्यात बदल करण्याची मागणी केली होती. मात्र, विद्यापीठाने विद्यार्थी संघटनांची मागणी मान्य न केल्याने मंगळवारी स्टुडंट लॉ कौन्सिल, छात्र युवा संघर्ष समिती आणि इतर समितीतर्फे आंदोलन करण्यात आले होते. त्यानुसार कलिना कॅम्पस येथील आंबेडकर भवनापासून या संघटनांनी मार्च काढून परीक्षा भवनाजवळ येऊन ठाण मांडून बसले होते. दुपारी ३ वाजता हा मार्च परीक्षा केंद्राजवळ दाखल झाला. त्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत याठिकाणीच ठाण मांडून बसले होते. या दरम्यान, या विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ विरोधी घोषणांनी या परिसर दणाणून सोडला तर कुलगुरु सुहास पेडणेकर यांनी राजीनामा देण्याची मागणीही यावेळी केली.

- Advertisement -

याबद्दल बोलताना स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार म्हणाले की, आम्ही या अगोदरच ६०/४० ला विरोध केला आहे. पण त्यानंतर शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला याची अंमलबजावणी करु नये, अशी देखील आम्ही केली होती. नव्या शैक्षणिक वर्षांपासून सुरू होणार्‍या नव्या बॅचसाठी ही पध्दत वापरावी, असा प्रस्ताव देखील आम्ही विद्यापीठासमोर दिला होता. याबाबत परीक्षा नियत्रंक अर्जुन घाटुळे यांनी आमच्याशी संपर्क साधला पण त्यांनी कोणतीही ठोस आश्वासन न दिल्याने आम्ही याठिकाणीच बसून आहोत. जोपर्यंत आम्हांला आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असे स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -