घरमनोरंजनसुशांत सिंह राजपूतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये

सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज, १४ जून रोजी दुपारी घडल्याचे समोर आले. वयाच्या ३४ व्या वर्षी या कलाकाराने आत्महत्या केल्याने बॉलीवूडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मूळचा बिहार येथील पटनामधील सुशांत सिंह राजपूत मुंबईत एकटा राहत होता. दरम्यान, मृत्यूची बातमी समजताच पोलीस, रुग्णवाहिका त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी दाखल झाले. सुशांतला दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास महापालिकेच्या विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटलमध्ये अपघात विभागात आणण्यात आला. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्या देहाची तपासणी करून ४ वाजेच्या सुमारास मृत घोषित केले. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करुन मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. कूपर हॉस्पिटलच्या परिसरामध्येच असलेल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या अखत्यारीतील कूपर शवविच्छेदन केंद्र (पोस्टमार्टेम सेंटर) येथे शवविच्छेदनाबाबतची पुढील कार्यवाही सुरु आहे. आज रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उद्या १५ जून रोजी सुशांतवर मुंबईमध्ये अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे कुटुंबिय पटनाहून मुंबईसाठी रवाना झाली असून त्याची बहिण मात्र सायंकाळी कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे.

नेमके काय घडले 

सुशांत सिंह राजपुतने शनिवारी आपल्या काही जवळच्या मित्रांना घरी जेवणासाठी आमंत्रित केले होते. रात्री पार्टीला उशीर झाल्यामुळे सर्वजण उशिरा झोपले होते. सुशांतसिंग हा देखील त्याच्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. दुपार होऊन देखील सुशांत झोपेतून जागा झाला नाही म्हणून काही मित्रांनी त्याचे बेडरूमचे दार ठोठावले मात्र आतून दार बंद होते. बराच वेळ झालं आतून काही प्रतिक्रिया येत नसल्यामुळे अखेर दार तोडून मित्रांनी आत प्रवेश केला असता सुशांतसिंग हा गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना सुशांतसिंगच्या खोलीत त्याची एक वैधकीय फाईल मिळून आली आहे. या फाईल वरून सुशांतला नैराश्याने ग्रासले होते व त्याच्यावर मागील सहा महिन्यांपासून उपचार सुरू होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. वांद्रे पोलिसांनी त्याच्या मित्रांना ताब्यात घेऊन त्यांचा जवाब नोंदवून घेण्यात येत आहे. सुशांतच्या घरात अद्याप कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट मिळून आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

दिशाच्या मृत्यूशी संबंध नाही 

मालाड मालवणी येथे ८ जून रोजी दिशा सालीयन हिने राहत्या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्या आणि सुशांत सिंगच्या आत्महत्याचा तूर्तास काही संबंध नसल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे म्हणणे आहे. दिशा ही सुशांतसिंग यांची व्यवस्थापक नव्हती. ती एका ज्या एजन्सीमध्ये नोकरी करत होती. त्या एजन्सी कडे अनेक बॉलिवूड कलाकारांची कामे होती. त्यापैकी एक सुशांतसिंग राजपुतचे काम त्या एजन्सीकडे होते. त्यामुळे दिशाचा सुशांतसिंगशी थेट संपर्क नव्हता.

हेही वाचा –

सुशांतच्या मृत्यूसंबंधीत बातम्यांवर दीपिका मीडियावर भडकली; म्हणाली, फरक ओळख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -