घरमनोरंजनकंगणा राणौतचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

कंगणा राणौतचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Subscribe

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव आले आहे. याप्रकरणी नुकतीच चौकशी झालेली बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणौत हिच्या डिजिटल टीमने एक ट्विट करून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. करण जोहर यांच्या मॅनेजरला समन्स पाठवण्यात आले; पण करण जोहरला नाही. कारण तो आदित्य ठाकरे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा जवळचा मित्र आहे, असे त्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे. आतापर्यंत अनेक कलाकार आणि निर्मात्यांचे मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जोरदार टीका होऊ लागली. चाहत्यांनी यावरुन करण जोहर, सलमान खान यांना लक्ष्य केले होते.अभिनेत्री कंगना राणौत हिनेही या प्रकरणात सातत्याने आवाज उचलला आहे.

- Advertisement -

याबाबत कंगना राणौतने सोमवारी एक ट्विट करुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. करण जोहर यांच्या मॅनेजरला समन्स पाठवण्यात आले; पण करण जोहर यांना नाही. कारण ते आदित्य ठाकरे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा जवळचा मित्र आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतच्या हत्येची चेष्टा थांबवावी, अशी टीका कंगना राणौतने केली आहे.

याच ट्विटला जोडून कंगनाने आणखी एक ट्विट केले आहे. कंगना राणौतच्या मॅनेजरला समन्स बजावण्यात आले नाही. तिथे मात्र थेट कंगनाला समन्स बजावले, मग करण जोहरच्या मॅनेजरला समन्स बजावण्यात आले, मुंबई पोलिसांनी नेपोटिझम थांबवावा, करण जोहरला समन्स नाही. कारण साहब को परेशानी ना हो इसलिये? असा आरोप तिने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -