घरताज्या घडामोडीBMC Budget 2020: सात मल जल केंद्रांसाठी सुधारीत निविदा

BMC Budget 2020: सात मल जल केंद्रांसाठी सुधारीत निविदा

Subscribe

राष्ट्रीय हरित आयोगाच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार, सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांसाठी टप्प्याटप्प्याने निविदा मागवण्यात येत आहे. या कामांमध्ये वरळी, धारावी, वर्सोवा, भांडुप, घाटकोपर, वांद्रे, मालाड आदींचा समावेश आहे. तर बोरीवली डॉन बॉस्को शाळा, गोरेगाव पंपिंग स्टेशन ते मालाड आयपीएस आणि मालाड आयपीएस या पंपिंग स्टेशनची उभारणी आदी तीन ठिकाणी मलजल बोगद्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. याशिवाय वर्सोवा पंपिंग स्टेशन, मिठी नदी मलजल प्रक्रिया केंद्र, एस.व्ही.रोड मलजल बोगदा, व वर्सोवा मलजल बोगदा आदी प्रकल्पांचीही कामे प्रगतीपथावर असून त्यासाठी आगामी आर्थिक वर्षात २२५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, राष्ट्रीय हरित लवाद, वन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्रालय यांच्या वेळोवेळी बदललेल्या मानकांमुळे आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश यामुळे मुंबई मलनि:सारण प्रकल्पातील कामांना विलंब झाला असल्याची खंत आयुक्तांनी आपल्या भाषणात व्यक्त केली आहे.

- Advertisement -

मुंबई मलनि:सारण प्रकल्प कामांसाठी एकूण तरतूद : ४०२.५५ कोटी रुपये

मलजल बोगद्यासाठी : ५० कोटी रुपये

- Advertisement -

प्रगतीपथावरील मलजल बोगद्यांसाठी २२५ कोटी रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -