घरCORONA UPDATEई- शिक्षणामुळे ठाणे जिल्ह्यातील आश्रम शाळेचे भवितव्य अंधारात

ई- शिक्षणामुळे ठाणे जिल्ह्यातील आश्रम शाळेचे भवितव्य अंधारात

Subscribe

ई शिक्षण काय असते हे माहीत नसणारे अडाणी पालक खर्चाच्या व कोरोना व्हायरस संसर्गाच्या भीती पोटी शाळेत पाठवण्याच्या मनस्थितीत नाही.

राज्यात गेले अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू असल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी व भटक्या विमुक्त जमातीचे विद्यार्थी आपल्या गावी रमले आहेत. गरिबीमुळे अनेकांच्या पालकांनी त्यांना गुरे राखणे, लाकूडफाटा गोळा करणे, वीट भट्टी, शेतीच्या कामावर पाठवले आहे असे विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेकडे आणणे मोठे आव्हान असणार आहे. त्यातच ई शिक्षण काय असते हे माहीत नसणारे अडाणी पालक खर्चाच्या व कोरोना व्हायरस संसर्गाच्या भीती पोटी शाळेत पाठवण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे यावर्षी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची विक्रमी गळती होणार असून अनेक गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची चिन्हे आहेत.

ठाणे जिल्ह्यात सामाजिक न्याय व आदिवासी विभागाच्या १३० आश्रम शाळा आहेत, या आश्रम शाळांमध्ये ११००० जवळपास विद्यार्थी शिक्षण घेत आहे. हे सर्व विद्यार्थी आपापल्या घरी आहे. पुढील आठवड्यापासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. या मुलांना पुन्हा शाळेचा आणण्याचे प्रयत्न चालू झाले. मात्र बहुतांश विद्यार्थी शाळेकडे न वळण्याचा धोका निर्माण झाला आहे. आधीच आश्रमशाळांमध्ये अनेक समस्या असताना आता शासनाने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा विचार सुरू केला आहे. या शिक्षण प्रणालीत अनभिज्ञ असणाऱ्या विद्यार्थी पालक शिक्षक व संस्थाचालकांना पुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहे.

- Advertisement -

या आदिवासी मुलांच्या घरी दूरदर्शन संच नाहीत. पालकांकडे मोबाईल नाही. गावात वीजेची समस्या इंटरनेट सेवेचा अभाव या सर्वांमुळे शिक्षण त्यांच्यासाठी खडतर प्रवास करणार आहे बहुतेक आश्रमशाळांमधील विद्यार्थीही स्थानिक नसतात पटसंख्या पूर्ण करण्यासाठी शेजारी तालुके व जिल्ह्यातून ते आणले जातात दुसऱ्या समाजातील अथवा बिगर आदिवासी व भटक्या मुलांना प्रवेश दिल्यास शासन अनुदान देत नाही तारेवरची कसरत करून पटसंख्या पूर्ण करावी लागते एकाच जातीची मुले शोधणे हे मोठे आव्हान आहे.

 पुढील शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करायच्या असतील तर शासन पुढील निकषांवर विचार करत असल्याचे समजते

- Advertisement -

* पाच विद्यार्थ्यांमध्ये एक खोली

* वर्गखोल्या कमी पडल्यास अंगणवाडी वर्ग इतर स्थानिक शासकीय व सामाजिक संस्थांच्या इमारतींचा वापर

* ग्रामपंचायतीमध्ये ई- शिक्षण द्यावे.

* पाच मुलांसाठी एक शौचालय व एक स्नानगृह

* शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात एक डॉक्टर एक परिचारिका एक रुग्णवाहिका उपलब्ध करणे.

* ही सर्व व्यवस्था हंगामी उभारावी त्यासाठी शासनाने निधी पुरवावा.

वरील सर्व बाबींकडे तटस्थपणे पाहिल्यास आश्रम शाळांची सद्यस्थिती पालकांची आर्थिक परिस्थिती शासकीय अंमलबजावणी यंत्रणा या सर्वांमुळे पुढील काळात आश्रमशाळांचे व त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात असल्याचे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -