घरमुंबईठाण्यातील स्वच्छता अभियानात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींचा गौरव

ठाण्यातील स्वच्छता अभियानात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींचा गौरव

Subscribe

हा सन्मान म्हणजे कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर प्रशासनाने दिलेली शाब्बासकीची थाप आहे, अशा शब्दात व्यासपीठावरील मान्यवरांनी भावना व्यक्त केली.

आवास दिनाचे औचित्य साधत केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत सर्वोत्तम कामगिरी केलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान म्हणजे कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर प्रशासनाने दिलेली शाब्बासकीची थाप आहे, अशा शब्दात व्यासपीठावरील मान्यवरांनी भावना व्यक्त केली.

पहिल्या पाच ग्रामपंचायतींचा सन्मान

प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत ठाणे जिल्ह्याने राज्यात अव्वल कामगिरी केली. ही योजना ग्रामीण विकास यंत्रणे अंतर्गत राबिवली जाते. या योजनेत कल्याण, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. या तालुक्यांचे गट विकास अधिकारी तसेच जिल्हा आणि तालुका स्तरीय घरकुल कक्षात काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांना वरील मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर प्रत्येक तालुक्यातील केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेचे उद्दिष्ट साध्य करणाऱ्या पहिल्या पाच ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला.

- Advertisement -

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्काराचे वितरण

तर यावेळी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणारा जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना प्रथम, द्वितीय, क्रमांक देऊन गौरवण्यात आले. सन २०१७-१८ आणि २०१८-१९ या वर्षाचे पुरस्कार यावेळी वितरीत करण्यात आले. सन्मानचिन्ह, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या शिर्के यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -