घरमुंबईएक तोळा सोने होणार अर्ध्या लाखाची गोष्ट !

एक तोळा सोने होणार अर्ध्या लाखाची गोष्ट !

Subscribe

ऐन लग्नसराईत भाव भडकला

चीनमधील करोना विषाणूच्या प्रकोपाचे पडसाद जगभर पडत असून त्याचा फटका सोने बाजारालाही बसत असल्यामुळे सोन्याचा भाव भडकला आहे. जागतिक बाजारपेठांमध्ये गुंतवणूक कमी करुन अनेकांनी सोने खरेदीकडे आपला मोर्चा वळविल्याने त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होत आहे. त्यामुळे ४३ हजारांवर असलेल्या एक तोळा सोन्याची किंमत येत्या काळात ५० हजारांच्या घरात जाण्याची शक्यता सोने व्यापार्‍यांकडून वर्तविण्यात येत आहे. ऐन लग्नसराईत सोने जास्तच भाव खाणार असे दिसत आहे. त्यामुळे जनसामान्यांना सोने खरेदी करताना नाकी नऊ येतील, असे दिसत आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात सध्या लग्नसराई सुरू असल्यामुळे सोने आणि चांदीच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारातदेखील सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. परिणामी सध्या सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले आहे. शनिवारी मुंबईतील झवेरी बाजारात सोन्याचा भाव 462 रुपयांनी वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. तर चांदीच्या दरात प्रति किलो 1047 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदीचा भाव 47 हजार 605 रुपये इतका झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या 95 वर्षात 10 ग्रॅम सोन्याची किंमत तिप्पटीने वाढली आहे. शनिवारी मुंबईत सोन्याचा भाव 43 हजार 520 रुपये इतका होता. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर येत्या काळात सोन्याचा भाव ५० हजारांच्या घरात जाण्याची भीती व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या घबराटीचा फटका जागतिक वस्तू बाजाराला बसला असून परिणामी सोन्याचा दर प्रति औंस 1606 डॉलरपर्यंत वाढला. गेल्या काही वर्षांतील सोन्याचा जागतिक बाजारातील हा सर्वोच्च दर आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2013 मध्ये जागतिक बाजारात सोने 1617 डॉलर प्रति औसपर्यंत वाढले होते. चांदीच्या दरात वाढ झाली असून चांदीचा भाव प्रति औंस 18.32 डॉलरवर गेला. दुसरीकडे जागतिक बाजारामध्ये शेअर बाजारातील गुंतवणूक कमी करुन सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकजण सोने खरेदीकडे वळत आहेत. बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने दरात 0.11 टक्क्यांची घट झाली. MCX मध्ये सोने दर प्रति दहा ग्रॅम 41 हजार 375 रुपये होता. चांदीचा भाव मात्र 1078 रुपयांनी वाढला. त्यामुळे चांदीचा भाव 47 हजार 340 रुपये झाला आहे. चीनमध्ये पसरलेल्या ‘करोना विषाणू’मुळे सोन्याची आयात-निर्यात बंद आहे. त्यामुळे याचा फटका सोन्याचा व्यापार आणि ग्राहकांना बसत आहे. येत्या काही दिवसात सोन्याचा भाव 50 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -