घरमुंबईचोरट्याने मोबाईल हिसकावला; प्रवाशाचा लोकलमधून पडून मृत्यू

चोरट्याने मोबाईल हिसकावला; प्रवाशाचा लोकलमधून पडून मृत्यू

Subscribe

कळवा रेल्वे स्टेशनवरील मोबाईल चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मोबाईल चोराला पोलिसांनी अटक केली आहे.

कळवा रेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातातील मोबाईल चोरट्याने खेचला. मोबाईल मिळावा यासाठी प्रवाशाने धावत्या लोकलमधून उडी मारली. प्लॅटफॉर्म संपल्यामुळे हा प्रवासी रुळावर पडून त्याचा मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार कळवा रेल्वे स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

thief pulled passenger for stole his phone

चोरट्याने प्रवाश्याचा मोबाईल हिस्कावला.पुढे काय झाले बघा.

Posted by My Mahanagar on Thursday, August 30, 2018

- Advertisement -

अशी घडली घटना

१९ ऑगस्टला कळवा रेल्वे स्टेशवर रात्री १२.५३ ला ही घटना घडली आहे. कळवा स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर हा सर्व प्रकार घडला आहे. कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या ट्रेनमधून चेतन अहिरराव प्रवास करत होता. दिवा स्थानकावर त्याला उतरायचे होते. त्यामुळे सचिन लोकलच्या दरवाज्यावर उभा होता. चेतनच्या हातामध्ये मोबाईल होता तो हिसकावण्याचा प्रयत्न प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या अजय सोलंकी या चोरट्याने केला. पण चेतनचा मोबाईल प्लॅट फॉर्मवर पडला. मोबाईलसाठी सचिनने धावत्या लोकलमधून उडी मारली. पण तोपर्यंत प्लॅटफॉर्म संपला होता. त्यामुळे सचिन रुळावर पडून जागीच त्याचा मृत्यू झाला.

मित्राच्या वाढदिवसासाठी आला होता ठाण्याला

चेतन अहिरराव हा मूळचा नाशिकचा होता. १९ ऑगस्टला मित्राच्या वाढदिवसासाठी तो दिव्याला आला होता. ठाण्यामधून दिव्याकडे जात असताना ही घटना घडली. यामध्ये चेतनचा नाहक बळी गेला आहे. हा सर्व प्रकार कळवा प्लॅटफॉर्मवर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपी अजय सोलंकीला बेड्या ठोकल्या. आरोपी कळवा स्थानकावरच राहतो. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -