घरमुंबईडोंगरीत चोरट्यांनी पळवला 280 किलो कांदा

डोंगरीत चोरट्यांनी पळवला 280 किलो कांदा

Subscribe

दोन विक्रेत्यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

गेल्या काही दिवसांत कांद्याने महागाईचा उच्चांक गाठला असतानाच डोंगरी येथे अज्ञात चोरट्यांनी दोन दुकानातून चक्क 280 किलोच कांदाच चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन विक्रेत्यांच्या तक्रारीवरुन डोंगरी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या वृत्ताला एसीपी अविनाश धर्माधिकारी यांनी दुजोरा दिला असून आरोपींचा शोध सुरु असल्याचे सांगितले. चोरट्यांनी कांदाची दोन गोणी चोरी केल्याने स्थानिक व्यापार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

अकबर अब्बास शेख हे वडाळा येथे राहत असून त्यांचे डोंगरी येथील डोंगरी मार्केटमध्ये कांदा-बटाटा विक्रीचे एक दुकान आहे. गेल्या काही दिवसांत कांदाने महागाईचा उच्चांक गाठला आहे, त्यामुळे त्यांनी आधीपासून कांदाचा जास्त स्टॉक दुकानात ठेवला होता. गेल्याच आठवड्यात त्यांनी प्रत्येकी 1१२ किलोच्या एकूण 22 गोणी त्यांच्या दुकानात ठेवल्या होत्या. गुरुवारी 5 डिसेंबरला ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन घरी गेले. दुसर्‍या दिवशी ते सकाळी आठ वाजता दुकानात आले. यावेळी त्यांना त्यांच्या दुकानातून प्रत्येकी 1१२ किलो कांद्याच्या दोन गोणी चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता त्यांच्या बाजूला इरफान शेख याचे दुकान आहे. त्याच्या दुकानातूनही चोरट्यांनी 56 किलो कांदा चोरी केल्याचे दिसून आले.

- Advertisement -

मुंबई 8गेल्या काही दिवसांत कांद्याने महागाईचा उच्चांक गाठला असतानाच डोंगरी येथे अज्ञात चोरट्यांनी दोन दुकानातून चक्क 280 किलोच कांदाच चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन विक्रेत्यांच्या तक्रारीवरुन डोंगरी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या वृत्ताला एसीपी अविनाश धर्माधिकारी यांनी दुजोरा दिला असून आरोपींचा शोध सुरु असल्याचे सांगितले. चोरट्यांनी कांदाची दोन गोणी चोरी केल्याने स्थानिक व्यापार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

अकबर अब्बास शेख हे वडाळा येथे राहत असून त्यांचे डोंगरी येथील डोंगरी मार्केटमध्ये कांदा-बटाटा विक्रीचे एक दुकान आहे. गेल्या काही दिवसांत कांदाने महागाईचा उच्चांक गाठला आहे, त्यामुळे त्यांनी आधीपासून कांदाचा जास्त स्टॉक दुकानात ठेवला होता. गेल्याच आठवड्यात त्यांनी प्रत्येकी 1१२ किलोच्या एकूण 22 गोणी त्यांच्या दुकानात ठेवल्या होत्या. गुरुवारी 5 डिसेंबरला ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन घरी गेले. दुसर्‍या दिवशी ते सकाळी आठ वाजता दुकानात आले. यावेळी त्यांना त्यांच्या दुकानातून प्रत्येकी 1१२ किलो कांद्याच्या दोन गोणी चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता त्यांच्या बाजूला इरफान शेख याचे दुकान आहे. त्याच्या दुकानातूनही चोरट्यांनी 56 किलो कांदा चोरी केल्याचे दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -