घरट्रेंडिंगNarayan Rane : हा तर "गाढवाचा गोंधळ आणि...", नारायण राणेंचा व्हिडीओ काँग्रेसकडून...

Narayan Rane : हा तर “गाढवाचा गोंधळ आणि…”, नारायण राणेंचा व्हिडीओ काँग्रेसकडून ट्वीट

Subscribe

मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. मंत्रालयाशी संबंधित कामासाठी नाही तर त्यांच्या इंग्रजीच्या ज्ञानावरून ते चर्चेत आहेत. मध्यंतरी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांच्या मंत्रालयाबाबत इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी भलतंच उत्तर दिलं, त्यामुळे ते चांगलेच ट्रोल झाले. आता पुन्हा एकदा नारायण राणे यामुळेच अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसने त्यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.

- Advertisement -

काँग्रेस म्हणते, “गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ”… अशी मोदींच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांची अवस्था आहे. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय सांभाळणाऱ्या या महान व्यक्तीच्या गावी “सिबिल स्कोर” सारखी सूक्ष्म गोष्ट देखील नाही, यावरूनच मोदी राजवटीत गल्ली ते दिल्ली एकंदरीत सगळा आनंदी आनंद आहे हेच दिसून येते.

हेही वाचा – Rituraj Singh Passes Away: हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेता ऋतुराज सिंह यांचं निधन

- Advertisement -

नारायण राणे यांचा संसदेतील व्हिडीओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शेअर केला होता. आता पुन्हा एकदा दमानिया यांनी नारायण राणे यांचा हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. यात नारायण राणे, सिबिल म्हणजे काय असं विचारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे.

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासात त्यांचा उडालेला गोंधळ असो, रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्याबाबतचे वृत्त असो, अशा विविध कारणांनी नारायण राणेंची माध्यमांत बरीच चर्चा आहे. आता त्यांचा आणखी एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे.

हेही वाचा – Chhagan Bhujbal : फक्त जरांगेंचेच ऐकणार का? भुजबळांचा सवाल

नारायण राणेंच्या व्हायरल व्हीडिओमध्ये काय?

CIBIL score मुळे राष्ट्रीय बँका प्रकरणे रिजेक्ट करतात, यासंदर्भात पत्रकारांनी नारायण राणेंना प्रश्न विचारला. परंतु, सिबिल स्कोर म्हणजे काय हेच नारायण राणेंना आठवेना. त्यामुळे सिबिल म्हणजे काय असा प्रतिप्रश्न पत्रकारांना राणेंनी विचारला. तेव्हा त्यांच्या मागे असलेल्या व्यक्तीने त्यांना सिबिलचा अर्थ समजावून सांगितला. त्यानंतर नारायण राणेंनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. बँक रिकामी झाल्यानंतर कोण कर्ज देणार? असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं.

दमानिया यांनी काय टीका केली?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यात त्या म्हणतात, “हे आपले महाविद्वान MSME मंत्री! भाईसाहेबांना CIBIL score म्हणजे काय हे माहीत नाही. प्रश्न : CIBIL score मुळे नॅशनॅलाइजेड बँक प्रकरणं रिजेक्ट करतात. त्यावर भन्नाट उत्तर… MSME : म्हणजे काय? हे तरी यांना माहीत आहे का? असा प्रश्नही अंजली दमानिया यांनी विचारला. तसंच, “मंत्री आहेत म्हणे…”, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील संसदेत गोंधळ

अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळीही नारायण राणेंचा सभागृहात गोंधळ झाला. यावेळीही अंजली दमानिया यांनी व्हीडिओ शेअर केला होता. सभागृहात खासदार कार्तिकेय शर्मा यांनी नारायण राणे यांना प्रश्न विचारला होता की, एमएसएमई (सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग) सेक्टरमधील कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने काय पावलं उचलली आहेत? मात्र, या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी नारायण राणे यांनी एमएसएमई सेक्टरमध्ये निर्यात कशी वाढवणार? कारखाने कसे सुरू होणार याबाबतची माहिती वाचून दाखवण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना प्रश्न समजावून सांगण्यात आला, आणि मग त्यांनी उत्तर दिलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -