घरमुंबईनागरिकांसाठी फिरत्या दवाखान्याची सुविधा

नागरिकांसाठी फिरत्या दवाखान्याची सुविधा

Subscribe

आजारी किंवा गर्भवतींना रुग्णालयात जाण्यासाठी खूपच धावपळ करावी लागत आहे. एवढेच नव्हे तर, प्रथमोचार न मिळाल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

वनसदृश्य परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी फिरत्या दवखानाखान्याची व्यवस्था करुन देण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविकांनी केली. वनसदृश्य भागात राहणाऱ्या नागरिकांना वन्यप्राण्यांकडून अधिक धोका असतो. या भागात कधी वन्यप्राण्यांकडून हल्ला झाला तर, संबधित व्यक्तीला प्रथमोपचार मिळत नाही. त्यामुळे पीडित दगावण्याची शक्यता असते. नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी या परिसरात फिरत्या दवाखान्याची व्यवस्था उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.

महापालिकेच्या स्थायी संमितीच्या बैठकीत भाजपच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी नागरिकांच्या गैरसोयीचा ठराव मांडला. प्रिती सातम या गोरगाव विभागत भाजप नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. सातम यांनी बैठकीत नागरिकांचा सुरक्षेतेच्या बाबतीत प्रश्न निर्माण केला आहे. मुंबईतील आरे कॉलनी परिसरात संजय गांधी उद्यान आहे. यासारख्या वनसदृश परिसरात बिबट्यांच्या हल्लामुळे तसेच साप, विंचू आणि इतर वन्यप्राण्यांकडून नागरिकांच्या जीवाला धोका असतो. या परिसरात तत्काळ वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे रुग्णांची खूप धावपळ होते. एवढेच नव्हे तर, पिडित रुग्णांना वेळेत प्रथमोचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच आजारी व्यक्ती, गर्भवती यांच्या उपचारासाठी पश्चिम द्रुतगति महामार्गाजवळील जोगेश्वरी टामा रुग्णालय किंवा सिध्दार्थ रुणालयात असा लांबचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे आपत्कालिन परिस्थितीत तातडीने उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती सातम यांनी त्यांच्या मागणीतून व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -