घरमुंबईमुंबईत अभिनेत्रीचा विनयभंग करुन फसवणूक; फोटोग्राफरविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबईत अभिनेत्रीचा विनयभंग करुन फसवणूक; फोटोग्राफरविरुद्ध गुन्हा दाखल

Subscribe

अंधेरीच्या लोखंडवालामध्ये राहाणाऱ्या एका टीव्ही अभिनेत्रीचा तिच्याच फोटोग्राफर मित्राने विनयभंग केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली असून त्यावर लवकरच अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

अंधेरी येथे राहणार्‍या एका मालिका अभिनेत्रीचा विनयभंग करुन फोटोशूटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करून तिची फसवणूक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी गौरव संदीप सेठी या फोटोग्राफरविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी विनयभंगासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याने अद्याप त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. २३ वर्षांची ही मालिका अभिनेत्री गेल्या दोन महिन्यांपासून तिच्या मैत्रिणीसोबत अंधेरीतील लोखंडवाला, यमुनानगर परिसरात भाड्याच्या रूममध्ये राहते. ती टीव्ही शोमध्ये काम करत असून इतर मालिकांसह चित्रपटात काम करण्यासाठी तिचे प्रयत्न सुरु आहेत. दोन वर्षांपूर्वी तिची गौरव सेठीशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. तो व्यवसायाने फोटोग्राफर असून त्याचे गोरेगाव परिसरात एक कार्यालय आहे. ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते.


Viral Video : तिची तक्रार विनयभंगाची; पोलीस विचारतात ‘दागिने का घातले’!

नक्की झालं काय?

त्यानंतर ते सोशल मीडियाच्या माध्यामतून एकमेकांच्या संपर्कात होते. अधूनमधून तिची गौरवशी भेटही होत होती. १३ जूनला सायंकाळी गौरव तिच्या अंधेरीच्या राहत्या घरी आला होता. यावेळी तिने त्याला फोटोशूटसाठी घेतलेले काही कपडे दाखवले. यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. काही वेळाने तो तिच्या घरातून निघून गेला. हा प्रकार तिने कोणालाही सांगितला नाही. स्वत:च्या फोटोशूटसाठी तिने गौरवला ऐंशी हजार रुपये दिले होते. मात्र, तिचे फोटोशूट न करता त्याने तिने दिलेल्या पैशांचा अपहार केला. हा प्रकार तिच्या निदर्शनास येताच तिने २३ ऑगस्टला ओशिवरा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच त्याला या गुन्ह्यांत अटक केली जाईल, असे पोलिसांकडून
सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -