घरमुंबईनौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अपघात

नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अपघात

Subscribe

ठाण्याच्या तीनहात नाका येथून भरधाव वेगाने जाणार्‍या एर्टिगा सुझुकी कारने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत मोटरबाईकस्वार जखमी झाला. या अपघात प्रकरणी नौपाडा पोलिसांनी सुझुकी कार चालकाला अटक केलीआहे. त्याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडीत रहाणारे विजय दिनकर जाधव (35) हे त्यांच्या ताब्यातील डिस्कव्हर मोटार सायकल घेऊन ठाण्यात तीनहात नाका सिग्नलकडे नितीन कंपनीकडून नाशिक मुंबई वाहिनीवरून मुलुंड चेकनाक्याकडे जात असताना मागून भरधाव वेगात येणार्‍या एर्टिगा मारुती सुझुकी कारने बाईकला धडक दिली. कारच्या धडकेत विजय जाधव याच्या डाव्या हाताला त डाव्या पायाला दुखापत झाली.याप्रकरणी मारुतीचा चालक प्रणित उद्धव सोनकांबळे रा.अंधेरी,मुंबई याला नौपाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisement -

इस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ वाहतूक कोंडी
दुसर्‍या घटनेत नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत इस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ सवानी मिल्लेनिअम टॉवर गुरुकुल सोसायटी पांचपाखाडी येथे मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास टाटाचा ट्र्क उलटा झाला या घटनेमुळे इस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली. घटनास्थळी ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ट्राफिक पोलीस,1 क्रेन 1 टॉविंग व्हॅन, याच्या मदतीने उलटा झालेला ट्र्क बाजूला काढण्यात आला . सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही वेळातच वाहतूक सुरळीत झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -