घरमुंबईवेगवेगळ्या गुन्ह्यात वॉण्टेड दोन आरोपींना अटक

वेगवेगळ्या गुन्ह्यात वॉण्टेड दोन आरोपींना अटक

Subscribe

घातक शस्त्रांसह अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या दोन आरोपींना नालासोपारा आणि उत्तर प्रदेशातून गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अझीम अकबर अन्सारी ऊर्फ अझीम खान आणि अशोककुमार वासुदेव मिश्रा अशी या दोघांची नावे असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांनी सांगितले.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पहिल्या गुन्ह्यातील तक्रारदार अल्पवयीन मुलगी वांद्रे येथील महाराष्ट्र नगरात राहते. तीन वर्षांपूर्वी तिचे दोन तरुणांनी अपहरण करुन तिला वांद्रे बस डेपोजवळ आणले होते. तिथे पार्क केलेल्या एका रिक्षात तिच्याशी या दोघांनी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर ते दोघेही पळून गेले होते. घरी आल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला होता.

- Advertisement -

तीन वर्षांपूर्वीचा गुन्हा
या घटनेनंतर त्यांनी वांद्रे पोलिसांत दोन्ही आरोपींविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी अपहरणासह विनयभंग आणि बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच यातील एक आरोपी अझीम अन्सारी हा नालासोपारा येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

दोघांना अटक
या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकातील धराडे, अंबावडे, शेख, प्रफुल्ल पाटील यांनी अझीम अन्सारी याला त्याच्या नालासोपारा येथील हनुमान नगर, अन्नम अपार्टमेंटमधील राहत्या घरातून अटक केली. चौकशीत त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावेळी त्याच्यासोबत इजाज मुनीर खान हा तरुण होता असे सांगितले. या दोघांनीच नंतर तक्रारदार मुलीचा विनयभंग केला होता. अझीमला वांद्रे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून याच गुन्ह्यात त्याला विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

शस्त्रांची विक्री करणार्‍याला पकडले
दुसर्‍या कारवाईत अशोककुमार मिश्रा याला उत्तर प्रदेशातून पोलिसांनी अटक केली. 28 वर्षांपूर्वी त्याला घातक शस्त्रांची विक्रीसाठी आला असता पोलिसांनी अटक केली. मात्र जामीन मिळताच तो पळून गेला होता. त्याच्याविरुद्ध न्यायालयाने नॉन बेलेबल वॉरंट जारी केले होते. अशोककुमार हा त्याच्या उत्तर प्रदेशातील गावी वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकातील अंबावडे, वारंगे, हक्के यांनी अशोककुमारला उत्तर प्रदेशच्या जौनपूर, बेलगाहान गावातून अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -