घरमहाराष्ट्र'ते स्वप्न भारी पडले', खडसेंनी मनातली खदखद बोलून दाखवली

‘ते स्वप्न भारी पडले’, खडसेंनी मनातली खदखद बोलून दाखवली

Subscribe

मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहिल्यामुळेच आपली अशी अवस्था झाली.. अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या राजकारणातले महत्त्वाचे राजकारणी आणि भाजपमधील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या काही काळापासून राजकीय वनवासात आहेत. आपल्यावर ही परिस्थिती का ओढवली? याचे उत्तर खुद्द खडसेनींच आता दिले आहे. “मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले म्हणून आज आपली अशी अवस्था झाली”, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. जळगावच्या सावदा येथे मुस्लिम समाजाच्यावतीने एकनाथ खडसे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यासोबतच ‘एक शाम नाथाभाऊ के नाम’ हा मुशायराचा कार्यक्रमही यावेळी झाला.

- Advertisement -
हे वाचा – खडसेंच्या सूचक वक्तव्याने भाजपात खळबळ

 

याच कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने खडसे यांना मुख्यमंत्री झालेले पाहायचे असल्याचे म्हटले. यावर आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर देताना खडसे म्हणाले की, “मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न बाळगल्यानेच माझी ही अवस्था झाली.” भाजप-सेनेचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात दोन नंबरचे मंत्री म्हणून खडसे यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र खडसे आणि फडणवीस यांच्यात सतत वादाची ठिणगी पडत होती.

- Advertisement -

हे वाचा – भाजप सोडणार नाही, खडसेंचा खुलासा

भोसरी येथील एमआयडीसीची जमीन खरेदी केल्याप्रकरणी एकनाथ खडसे अडचणीत आले होते. या जमिनीची मुळ किमंत ३१ कोटी ११ लाख असताना खडसे यांनी फक्त ३ कोटी ७५ लाखांना ती विकत घेतल्यामुळे वाद निर्माण झाला होता. तसेच महसूल मंत्रीपदावर असताना पदाचा गैरवापर करत जमीन विकत घेतल्यामुळे विरोधकांनीही त्यांच्याविरोधात रान उठवले होते. त्याचदरम्यान एका हॅकरने खडसे आणि दाऊद यांचे मोबाईलवर संभाषण झाले असल्याचा आरोप केल्यामुळे खडसे आणखीनच अडचणीत आले होते. त्यामुळे खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, त्यानंतर त्यांना आतापर्यंत मंत्रीपदाची शपथ देण्यात आली नाही.


हे देखील वाचा – अन गोटेंनी खडसेंसमोर चक्क हात जोडले
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -