घरमुंबईबारसू रिफायनरीसाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी केंद्राकडे मागणी केली होती; पत्र सोशल...

बारसू रिफायनरीसाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी केंद्राकडे मागणी केली होती; पत्र सोशल मीडियावर व्हायरल

Subscribe

मुंबई : राजापूर रिफायनरीसाठी (Rajapur Refinery) होणाऱ्या सर्वेक्षणाविरोधात कालपासून आंदोलन सुरू केले आहे. हा वाद आता चिघळत असताना रत्नागिरीतील बारसू (Barsu) येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच केंद्राला पत्र लिहिले होते, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant)  यांनी केला आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेली पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

बारसू रिफायनरीला स्थानिकांकडून विरोध होत असताना प्रशासनाकडून आंदोलन करणाऱ्या स्थानिकांना इशारा देण्यात आला आहे. याशिवाय आंदोलन करणाऱ्या २५ महिलांना ताब्यात घेतल्यामुळे हा वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे. अशातच सत्ताधारी विरोधक यांच्यामध्येही या प्रकल्पावरून जुंपली आहे. शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काही लोकांकडून जाणिवपुर्वक या प्रकल्पाविषयी गैरसमज पसरविले जात आहे.

- Advertisement -

 बारसूत प्रकल्प व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिफायनरीच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 12 जानेवारी 2022 रोजी पत्र लिहिले होते. बारसूमध्ये 13 हजार एकर जमीन राज्य सरकार उपलब्ध करून देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी दर्शवली होती. तसेच बहुतांश जमीन ही ओसाड असल्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न येणार नाही असेही त्यांनी पत्रात नमूद केले होते. सध्या हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राज्यातील काही प्रकल्प गेल्या काही महिन्यांपूर्वी गुजरातला गेल्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदांचा धडाका लावला होता. सध्या रिफायनरीसाठी होणाऱ्या सर्वेक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या वतीने सातत्याने केला जात आहे.

- Advertisement -

पण आता उद्धव ठाकरेंच्या पत्रानंतर केंद्र सरकारने रिफायनरी उभारण्यास परवानगी दिली होती, हे समोर आल्यामुळे उद्धव ठाकरेंचीही कोंडी झाली आहे. उद्धव ठाकरेंनी पत्र लिहताना बारसूमधील लोकांना विश्वासात घेतले होते का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्यामुळे आज दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे बारसू रिफायनरीविरोधात काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -