घरमुंबईपेपर तपासणीच्या कामात एकसमानता येणार

पेपर तपासणीच्या कामात एकसमानता येणार

Subscribe

मुंबईसह देशभरातील उच्च शिक्षणाचे धडे देणार्‍या कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांची पेपर तपासणी करताना कोणत्याही प्रकारची एकसमानता आढळून आलेली नाही. त्याचा फटका विद्यार्थ्यांच्या निकालावर बसतो. राज्यातीलच उदाहरण द्यायचे झाले तर स्वायत्तता कॉलेज आणि इतर कॉलेजांमध्ये वेगवेगळ्या धर्तीवर पेपर तपासणी केली जात असून त्यात कोणत्याही प्रकारची एकसमानता नसल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे.

मुंबईसह देशभरातील उच्च शिक्षणाचे धडे देणार्‍या कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांची पेपर तपासणी करताना कोणत्याही प्रकारची एकसमानता आढळून आलेली नाही. त्याचा फटका विद्यार्थ्यांच्या निकालावर बसतो. राज्यातीलच उदाहरण द्यायचे झाले तर स्वायत्तता कॉलेज आणि इतर कॉलेजांमध्ये वेगवेगळ्या धर्तीवर पेपर तपासणी केली जात असून त्यात कोणत्याही प्रकारची एकसमानता नसल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. या सर्वांची गंभीर दखल आता केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे घेण्यात आलेली असून पेपर तपासणीसंदर्भात नियमावली तयार करुन त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश युजीसीकडून नुकतेच देण्यात आले आहेत.

देशभरातील उच्च शिक्षणाचे धडे देणार्‍या विद्यापीठांमध्ये पेपर तपासणी ही वेगवेगळ्या पध्दतीने केली जात आहे. अनेक कॉलेजांमध्ये मॉडेल उत्तरपत्रिकेच्या माध्यमातून पेपर तपासणी केली जात असली तरी अनेक कॉलेजांमध्ये पेपर तपासणीसाठी प्राध्यापकांकडून वेगवेगळे निष्कर्ष वापरले जातात. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे तक्रार केली होती. तर काही पालकांनी देखील केंद्रीय माहिती आयोगाकडे तक्रार केली होती. ज्याची दखल घेत आयोगाने नुकत्याच झालेल्या सुनावणी केंद्रीय विद्यापीठ अनुदानास यासंदर्भात पाऊले उचलण्याची सूचना केल्या होत्या. त्यानुसार यापुढे त्या त्या विद्यापीठांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार पेपर तपासणीच्या कामांत ही एकसमानता आणण्यासाठी नियमावली तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे.

- Advertisement -

यासंदर्भात केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी देशभरातील विद्यापीठांना परिपत्रक पाठवित ही एकसमानता आणण्यासाठीची सूचना केली आहे. या परिपत्रकानुसार विद्यापीठांनी संलग्नित कॉलेजांमध्ये यासंदर्भात प्राध्यापकांची बैठक आयोजित करीत ही नियमावली तयार करण्याची सूचना केली आहे. या नियमावलीनुसारच पेपर तपासणी करणे अनिवार्य असणार आहे. प्राध्यापकांनी युजीसीच्या या नियमांचे स्वागत केले आहे. या निर्णयाबद्दल बोलताना प्राध्यापक आणि मुंबई विद्यापीठाचे मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य वैभव नरवडे म्हणाले, हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा तर होईल पण निकालही वेळेत लागेल. त्याचबरोबर वारंवार प्राध्यापकांना द्यावे लागाणारे प्रशिक्षण देण्याची गरज भासणार नाही. ही नियमावली पेपर तपासणीचे काम सुरू होण्याअगोदर सुरू करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -