घरमुंबईउल्हासनगरमध्ये शाळेतील स्लॅब कोसळून ३ विद्यार्थिनी जखमी

उल्हासनगरमध्ये शाळेतील स्लॅब कोसळून ३ विद्यार्थिनी जखमी

Subscribe

वर्ग सुरु असताना वर्गातील छताचे प्लॅस्टर कोसळून विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शाळेने प्रकरण दाबण्याचा मोठा प्रयत्न केला.

सोमवारपासून शाळेला सुरुवात झाली. शाळेच्या दुसऱ्याच दिवशी उल्हासनगरमध्ये एक धक्कदायक घटना समोर आली आहे. वर्ग सुरु असताना वर्गातील छताचे प्लॅस्टर कोसळून विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शाळेने प्रकरण दाबण्याचा मोठा प्रयत्न केला. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शाळेत घुसून हा प्रकार चव्हाट्यावर आणला.

काय आहे नेमकी घटना?

उल्हासनगरच्या कॅम्प १ भागात झुलेलाल ट्रस्टची शाळा आहे. या शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरील क्लास रूम नंबर २४ मध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी वर्गात इयत्ता दहावीचे ५२ विद्यार्थी उपस्थित होते. वर्गात शिक्षिका शिकवत असतानाच अचानक खिडकीजवळ सिलिंगचं प्लॅस्टर विद्यार्थिनींच्या डोक्यात कोसळलं. या घटनेत तीन विद्यार्थिनींच्या डोक्यावर आणि चेहऱ्याला दुखापत झाली आहे. या घटनेत दिया बठीजा, सिद्धी आणि जिया टेकचंदानी या विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत.

- Advertisement -

CCTV : वर्ग सुरु असताना वर्गातील छताचे प्लॅस्टर कोसळून विद्यार्थी जखमी झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. #MyMahanagar

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜೂನ್ 18, 2019

इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी

या घटनेनंतर पत्रकार रिपोर्टिंगसाठी शाळेत गेले असता सुरुवातीला असा काही प्रकार शाळेत घडलेलाच नसल्याचा दावा शाळेच्या महिला शिक्षिका आणि ट्रस्टींनी केला. या प्रकारानंतर मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी शाळेत जाऊन प्रशासनाला धारेवर धरले. १५ दिवसात शाळेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या घटनेमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

चेंबूरमध्ये पेट्रोल पंपाचा स्लॅब कोसळला; २ जण जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -