घरमुंबईडोंबिवलीत २७५ हून अधिक व्हिंटेज गाड्यांच्या प्रतिकृतीचे अनोखे प्रदर्शन

डोंबिवलीत २७५ हून अधिक व्हिंटेज गाड्यांच्या प्रतिकृतीचे अनोखे प्रदर्शन

Subscribe

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा ७० वा गणेशोत्सव साजरा करत आहेत. दरवर्षी, गणेशोत्सवादरम्यान विविध विषयांवरील प्रदर्शनांचे आयोजन मंडळातर्फे करण्यात येते. यंदाच्या वर्षी व्हिंटेज गाड्यांच्या प्रतिकृतींचे अनोखे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. मनसेचे गटनेता मंदार हळबे यांच्या हस्ते आज, बुधवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. या  प्रदर्शनात सुमारे २७५ हून अधिक व्हिंटेज गाड्यांच्या प्रतिकृती ठेवण्यात येणार आहेत.

गेल्या तीस वर्षांपासून पुण्याच्या RTO मध्ये काम करणारया रत्नाकर जोशी यांनी देश-विदेशातील विविध गाड्यांचा प्रतिकृतींचा संग्रह केला आहे. त्यामध्ये देशाबरोबरच अमेरीका, इंग्लंड आणि आँस्ट्रेलियातील विविध मोटार कंपन्यांनी काढलेल्या जगप्रसिद्ध मोटारींच्या २७५ हून‌ आहेत. डोंबिवलीमध्ये या अनोख्या प्रदर्शनाचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. सुयोग मंगल कार्यालय, टिळकनगर, डोंबिवली (पूर्व) येथे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत खुले राहणार आहे. या प्रदर्शनासाठी घेण्यात येणाऱ्या देणगीतून मंडळाच्या सेतु-एक हात मदतीचा या संकल्पनेअंतर्गत महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -