घरदेश-विदेशमल्ल्याला चिंता करायची गरज नाही; भारतातील तुरूंग चांगले - राहुल गांधी

मल्ल्याला चिंता करायची गरज नाही; भारतातील तुरूंग चांगले – राहुल गांधी

Subscribe

स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेला गंडा घालून फरार झालेला विजय माल्ल्या सध्या आर्थर रोड तुरुंगावरुन चिंतते आहे. राहुल गांधी यांनी लंडन येथे भारतातील तुरूंग चांगले असल्याचा टोला लगावत विजय माल्ल्या याच्या मागणीची खिल्ली उडवली.

तुरुंग हे आरोपींना असह्य वाटत असले तरी विजय मल्ल्या जितकी चिंता करतो आहे, तितके ते नक्कीच असह्य नाहीत. त्यामुळे आपल्याला वेगळी वेगणूक मिळेल अशी अपेक्षा विजय मल्ल्याने ठेऊ नये, अशी टीका काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी लंडन येथे केली. गांधी सध्या दोन दिवसाच्या लंडन दौऱ्यावर आहेत. लंडन येथे इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या परिसंवादात राहुल गांधी बोलत होते. विजय मल्ल्याविषयी प्रश्न विचारला असता राहुल म्हणाले की, भारतामध्ये कायदा हा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे मल्ल्याने स्वतःला विशेष वागणूक मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये. तसेच विजय मल्ल्या फरार होण्याआधी भाजपच्या काही नेत्यांना भेटला होते, असे वक्तव्यही गांधी यांनी केले. मात्र या विषयावर त्यांनी अधिक माहिती देणे टाळले आहे, असे पीटीआयच्या सूत्रांची माहिती आहे.

राष्ट्रीयकृत बँकेला नऊ हजार कोटींचा चुना लावून दारू व्यापारी विजय मल्ल्या भारताबाहेर फरार झालेला असून त्याच्यावर फसवणूक आणि पैशांच्या अफरीतफरीचा आरोप आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत लंडन कोर्टात सध्या सुनावणी सुरु आहे. त्याच्यावरील आरोप निश्चित झाल्यानंतर त्याला आर्थर रोड तुरुंगातील बॅरेक क्र. १२ मध्ये ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लंडन कोर्टाच्या न्यायाधीश इमा अर्बुथनॉट यांनी आर्थर रोड तुरुंगाचा व्हिडिओ तीन आठवड्यात लंडन कोर्टात सादर करण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

पंतप्रधानांच्या जवळीकीमुळे निरव मोदी, चोक्सीवर कारवाई नाही

भाजप सरकारच्या काळात अनेक आर्थिक गुन्हेगार भारताबाहेर फरार झाले आहेत. मोदी सरकारने अशा गुन्हेगारांच्याबाबतीत अतिशय सौम्य धोरण ठेवले आहे, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली. निरव मोदी, मेहुल चोक्सी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जवळचा संबंध असल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई केली गेली नाही, असेही गांधी म्हणाले आहेत. दागिन्यांचे व्यापारी निरव मोदी आणि गितांजली जेम्सचे प्रमोटर मेहुल चोक्सी यांनी पंजाब अँड नॅशनल बँकेच्या १३ हजार कोटींवर हात मारून देशाबाहेर पळ काढलेला आहे. सीबीआय आणि ईडीने दोघांवरही फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -