घरCORONA UPDATEएसटीच्या अनेक चालक- वाहकाला केलं तडकाफडकी निलंबीत!

एसटीच्या अनेक चालक- वाहकाला केलं तडकाफडकी निलंबीत!

Subscribe

कामत हलगर्जीपणा करणाऱ्या मुंबई विभागातील एक अधिकाऱ्याला एसटी महामंडळाचे व्यस्थापकीय संचालक शेखर चन्ने याने निलंबित केले होते. आता त्यानंतर कल्याण आगारातील चालक वाहकांसह अनेक एसटी कर्मचाऱ्यांनावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई आदेश देऊनही कामावर उपस्थिती न झाल्यामुळे करण्यांत आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहेत. तसेच येणाऱ्या दिवसात मुंबई, ठाणे आणि पालघर या विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याचे चिन्ह आहे.

best bus

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून मुंबई, ठाणे आणि पालघर विभागात विशेष एसटी फेऱ्या चालविण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त सुद्धा अडकलेल्या इतर राज्यातील नागरिकांना आणि विद्यार्थाना त्यांच्या  जिल्हापर्यत पोहचविण्याचे काम एसटी महामंडळाकडून युद्धपातळीवर सुरु आहे. तसेच आता रेल्वेच्या विशेष गाड्या मुंबईतून धावत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईत दाखल होत आहे. परिणामी एसटी बसेसचा मागणी सुद्धा वाढली आहे. मात्र एसटी महामंडळाकडे कर्मचारी उपस्थितीत नसल्यामुळे एसटी महामंडळ प्रभावीपणे सेवा देता येत नाही आहे. अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दळणवळणाची सेवा पुरवणाऱ्या एसटीला मुंबई, ठाणे आणि पालघर विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागल्याने जे कर्मचारी मुंबई, ठाणे आणि पालघर मध्ये उपलब्ध असून देखील कंटेन्मेंट झोन वगळून कर्तव्यावर येण्यास नकार देत आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या वर कडक कारवाई करण्याचे इशारा एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वी दिले आहेत. त्यानुसार कल्याण आगारातून एकाच दिवशी १५ एसटीचा चालक- वाहकांना तडकाफडकी निलंबनाची कारवाई करून चौकशीचे आदेश दिले आहे. एसटीचा तिन्ही विभागात चालक,  वाहक कमी पडत असल्याने एसटी महामंडळाला चालक वाहकसह कर्मचारी बोलविण्यात आले आहें.

- Advertisement -

कारवाई करण्याचे कारण

लॉकडाऊन काळात अनेक कर्मचारी गाव खेड्यात अडकून आहे. या कर्मचारी वर्गाला कामावर रुजू होण्याबाबत कळविण्यात आले होते.  तसेच काहीना त्यांच्या घरापासून म्हणजेच नाशिक, धुळे, शिरपूर, सातारा या ठिकाणावरून कामाच्या ठिकाणापर्यंत येण्यासाठी वाहनांची देखील व्यवस्था एसटी महामंडकडून करण्यात आली होती. तरी देखील काही कर्मचारी कामावर रुजू होण्यास नकार देत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन केल्यास फोन उचलत नाहीत. तसेच अनेक कर्मचारी मोबाइल बंद करून ठेवत आहे. अनेकदा आगार व्यस्थापक कडून पत्र पाठवून त्याला उत्तर न देत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांनावर निलंबिनाची कारवाई करण्यात आली आहे. आता मुंबई, ठाणे विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

युनियनच्या प्रतिनिधींवर सुद्धा होणार कारवाई?

- Advertisement -

निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची बाजू घेण्यासाठी येणाऱ्या युनियन प्रतिनिधी वर सुध्दा कामात अडथळा आणला म्हणून एसटी महामंडळ कारवाई करण्यात येणार आहे. तसेच एसटी महामंडळ मध्ये कार्यरत असलेल्या युनियनला सुद्धा महामंडळाकडून पत्र पाठवून कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास प्रवृत्त करा अशी विनंती करण्यात येणार आहे अशी माहिती एसटी महामंडळाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली आहेत.


हे ही वाचा- माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार – पृथ्वीराज चव्हाण


 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -