घरदेश-विदेशVidya Balan: मी दान करत नाही, विद्या बालन स्पष्टच बोलली; देशात धार्मिक...

Vidya Balan: मी दान करत नाही, विद्या बालन स्पष्टच बोलली; देशात धार्मिक ध्रुवीकरण झालंय…

Subscribe

सध्या विद्या बालन तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'दो और दो प्यार' या चित्रपटामुळे बॉलिवूडमध्ये चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने एक मोठं विधान केलं आहे, ज्यामुळे आता सोशल मीडियात खळबळ उडाली आहे.

मुंबई: सध्या विद्या बालन तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दो और दो प्यार’ या चित्रपटामुळे बॉलिवूडमध्ये चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने एक मोठं विधान केलं आहे, ज्यामुळे आता सोशल मीडियात खळबळ उडाली आहे.

नुकतीच विद्या बालन हिने धर्माबाबत वक्तव्य केलं आहे. ती म्हणाले की, धर्माचा विचार केला तर देशातील लोकांची मते भिन्न आहेत. लोक येथे अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे त्यांना ओळख मिळेल. अभिनेत्री म्हणाली की, पूर्वी देशाला कोणतीही धार्मिक ओळख नव्हती पण आता परिस्थिती खूप बदलली आहे. (Vidya Balan on Spiritual structures do aur do pyar actress never donate religious construction )

- Advertisement -

मी धार्मिक कामासाठी दान करत नाही

नुकतेच ‘अनफिल्टर्ड बाय समदीश’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विद्या बालनला विचारण्यात आले की, आता देशाचे धर्मावर ध्रुवीकरण झाले आहे असे तिला वाटते का? यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणाली, ‘मला वाटतं आता खूप ध्रुवीकरण झाले आहे. पूर्वी आपल्या देशाला कोणतीही धार्मिक ओळख नव्हती, पण आता मला असे वाटते की हे केवळ राजकारणात नाही तर सोशल मीडियावरही आहे. आपण जगात कुठेतरी हरवलो आहोत. आपण आपली ओळख शोधत असतो, जी आपल्याकडे नाही.

विद्या बालन म्हणाली, ‘मी कधीही कोणत्याही धार्मिक कामासाठी पैसे दिलेले नाहीत. मी आरोग्यसेवा, स्वच्छता आणि शिक्षणासाठी निधी देते. मी स्वतः खूप धार्मिक आहे आणि रोज पूजाही करते.

- Advertisement -

या क्षेत्रांसाठी करायचंय काम

जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आले की तिला कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडते? यावर उत्तर देताना विद्या म्हणाली, ‘मला आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षणासाठी काम करायला आवडते. जर रुग्णालये बांधली जात असतील किंवा शाळा आणि शौचालये बांधली जात असतील, तर मी त्याच्या बांधकामासाठी आनंदाने पैसे देईन, परंतु मी धार्मिक स्थळांच्या बांधकामासाठी देणगी देत नाही.

राजकारणापासून लांबच बरं

याशिवाय विद्या बालन राजकारणाबाबत म्हणाली, ‘मी यावर भाष्य करणार नाही. लोक संतप्त होऊन बहिष्कार टाकतात. मला राजकारणाची भीती वाटते. मला कुठेतरी बंदी घातली तर अडचण येईल. मी राजकारणापासून दूरच असते.

(हेही वाचा: Lok Sabha 2024: ठाकरे गटाचा वचननामा जाहीर; जाणून घ्या काय आहेत घोषणा?)


Edited By- Prajakta Parab 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -