घरमुंबईUddhav Thackeray : भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी 1 जुलैला महापालिकेवर विराट मोर्चा काढणार - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी 1 जुलैला महापालिकेवर विराट मोर्चा काढणार – उद्धव ठाकरे

Subscribe

Uddhav Thackeray : मुंबई : महापालिकेतल्या भ्रष्ट्राचाराला वाचा फोडण्यासाठी, जाब विचारण्यासाठी येत्या 1 जुलैला शिवसेना (Shivsena) महापालिकेवरती विराट मोर्चा काढणार आहे. आज शिवसेना भवन येथे मुंबईतील नगरसेवकांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माहिती दिली. (Virat will take out a march on the municipal corporation on July 1 to crack down on corruption Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे म्हणाले की, काल शिवसेनेचा सत्तावन्नवा वर्धापन दिन साजरा झाला साजरा केला. त्याच्या आदल्या दिवशी बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्रातल्या प्रमुख शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्याचं शिबीर वरळी येथे पार पाडलं. आज बऱ्याच दिवसानंतर मुंबईतल्या नगरसेवकांची बैठक घेतली कारण मध्ये मध्ये काही कानावरती येत असते की कशी कामं तिकडे चाललेली आहेत एक वर्ष जवळपास होऊन गेलं. महापालिका आता विसर्जित झाली आहे. निवडणुका आज होतील उद्या होतील परवा होतील. पावसाप्रमाणे निवणुकासुद्धा लांबत चालल्या आहेत. निवडणुका घेण्याची हिंमत हे आताचं सरकार ज्याचं वर्णन काही जण बेकायदेशीर करतात ते काही घेत नाही आहेत. लोकांची कामं, लोकांची सेवा करायची कशी हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. पैसा उधळला जातो आहे. खर्च केला जात आहे, त्याला जाब विचारणारा कोणी नाही, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस सध्या ‘नावडाबाई’ झालेत, ‘अर्धवटराव’ टीकेवरून उद्धव ठाकरेंचा पलटवार

ज्यावेळेला महापालिकेमध्ये जनतेचे प्रतिनिधी असतात तेव्हा तिथे प्रशासन प्रस्ताव पाठवत असतं स्थायी समितीमध्ये सर्व पक्षीय प्रतिनिधी असतात. त्यांच्या समोर त्यावर चर्चा होते. मंजूरी ना मंजूरी होते आणि मग करार केलं जातं. आता आपण पाहतो आहोत वारेमाप उधळपट्टी चालली आहे. मग ती रस्त्याच्या नावाने, जी-२० च्या नावाने किंवा आणखी कशाची असेल मुंबईला मायबाप कोणी राहिलेलं नाही आहे. सगळं काही आहे ते लुटालुट चालली आहे आणि या महापालिकेतल्या भ्रष्टाचाराला  वाचा फोडण्यासाठी, जाब विचारण्यासाठी येत्या 1 जुलैला शिवसेना महापालिकेवरती विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व आदित्य करतील, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

- Advertisement -

लोकांच्या मनामध्ये जी एक खदखद आहे. त्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक काळ असा होता, जेव्हा मुंबई महापालिका ही जवळपास साडे सहाशे कोटी तुटीमध्ये होती. त्याच्यानंतर शिवसेनेने कारभार जेव्हा सांभाळला. तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास मी ब्याण्णव हजार कोटींच्या ठेवीपर्यंत महापालिकेची तिजोरी आमच्या कारभारांनी म्हणा किंवा आमच्या सहकाऱ्यांनी म्हणा त्याच्यात भर पडली आणि हे सगळे पैसे काही महापालिकेचे होते असं नाही त्याच्यामध्ये काही ठेवी होत्या आणि या ठेवींमधूनच मग तो कोस्टल रोड असेल, आणखीन काही असतील जनतेच्या उपयोगाची कामं आणि योजना महापालिका पार पाडत होती. आता मात्र कोणतंही काम असलं तरी बेधडकपणाने महापालिकेचा पैसा वापरला जातो आहे. माझ्या कानावर असं आलं की जवळपास आत्तापर्यंत साधारणतः सात आठ ते नऊ हजार कोटी त्या एफडीमधून वापरण्यात आलेले आहेत. हा जनतेचा पैसा आहे आणि या जनतेच्या पैशाची लूट, त्याचा हिशोब हा जनतेला त्यांना द्यावाचं लागेल आणि तो हिशोब, त्याचा जाब विचारण्यासाठी येत्या एक जुलैला मुंबई महापालिकेवरती शिवसेना विराट मोर्चा काढणार आहे. आणि मला माहिती आहे, की तेव्हा आयुक्त असतील, नसतील, पण शेवटी मुंबईकरांच्या मनातलं असंतोषाला वाचा फोडण्याचं काम आम्ही करणार आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आगामी काळात महापालिकेच्या निवडणूका येणार आहेत आणि त्यामध्ये भ्रष्टाचारचे खरे चेहरे समोर येतील, असे ते म्हणतात. मग येऊ देत आम्ही त्यांचा चेहरा समोर आणलेला आहे. सातत्याने रस्त्यामध्ये कसा घोटाळा झाला, खडीमध्ये कसा घोटाळा झाला, इतर ठिकाणी कसे घोटाळे झाले, ते मांडतो आहोत आणि त्याचंच एक मोठं स्वरूप हा मोर्चा असेल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -