घरमुंबईआयुर्मान संपलेल्या लिफ्टची परिवहन विभागात दहशत

आयुर्मान संपलेल्या लिफ्टची परिवहन विभागात दहशत

Subscribe

दुर्घटना झाल्यास एमटीएनएलवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा

राज्यभर रस्ते सुरक्षा नियमाचे धडे देणार्‍या परिवहन विभाग स्वत:च असुरक्षित झाला आहे.परिवहन आयुक्त कार्यालयात आयुर्मान संपलेल्या लिफ्टने प्रवास होत असल्याची धक्कादाय माहिती दैनिक ‘आपलं महानगर’च्या हाती आली आहे.परिवहन आयुक्त कार्यालयात चार लिफ्टचे आयुर्मान संपल्याने त्या भंगारात पाठवण्याचा प्रस्ताव याआधीच प्रशासनाकडे पडून आहे. याची दखलसुद्धा विभागाकडून घेण्यात येत नव्हती. जेव्हा स्वत:उपपरिवहन आयुक्त आणि परिवहन कार्यालयातीन कर्मचारी या लिफ्टमध्ये अडकले, तेव्हा याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर या प्रकाराची दखल घेत परिहवन विभागाने एमटीएनएलच्या अधिकार्‍यांना चांगलेच झापले आहे. इतकेच नव्हे,तर जर या आयुर्मान संपलेली लिफ्टमध्ये कोणतीही दुर्घटना झाल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यभरातील परिवहन विभागाचा कारभार ज्या कार्यालयातून चालवला जातो, अशा परिवहन आयुक्त कार्यालयाला आतापर्यंत स्वतंत्र इमारत मिळालेली नाही.भाडेतत्वावर कार्यालय घेऊन परिवहन आयुक्त कार्यालय बसविण्यात येत असल्यामुळे नेहमीच त्याचे कार्यालय इतर ठिकाणी हलविण्यात येते. वांद्रे येथे जिल्हा अधिकारी कार्यालयात परिवहन आयुक्त कार्यालय होते. 2 डिसेंबर 2019 रोजी ते कार्यालय हुतात्मा चौकाच्या एमटीएनएल एक्सचेंज इमारतीत पाचव्या माळ्यावर हलविण्यात आले आहे.

- Advertisement -

मात्र पाचव्या मजल्यावरील कार्यालय गाठण्यासाठी कर्मचार्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी एकूण तीन लिफ्ट वापरात आहेत. या लिफ्ट वारंवार बंद पडत असून त्यामध्ये बहुतेकवेळा कर्मचारी अडकल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे खुद्द परिवहन उपायुक्तच गुरूवारी या लिफ्टमध्ये अडकले.त्यांनंतर कार्यालयात त्यांना बाहेर काढण्यासाठी खळबळ उडाली. परिवहन उपायुक्तांना सुरक्षित लिफ्टमधून बाहेर काढण्यात आले.त्यानंतर लिफ्ट बंद पडण्यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न परिवहन विभागाने केला असता, कोणत्याही तांत्रिक कारणास्तव लिफ्ट बंद पडत नसून त्यांचे आयुर्मानच संपल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

आयुर्मान संपलेली लिफ्ट 1982 बसविली होती

- Advertisement -

हुतात्मा चौकाच्या एमटीएनएल एक्सचेंज इमारतीमध्ये 1982 साली बसवलेल्या एकूण चार लिफ्टचे आयुर्मान संपल्याने त्या भंगारात पाठवण्याचा प्रस्ताव याआधीच प्रशासनाकडे पडून आहे. तसेच त्यांना पर्याय म्हणून शेजारच्या विंगमध्ये चार नव्या लिफ्ट सुरू करण्याचा निर्णयही झाला आहे. मात्र, अद्याप चारपैकी केवळ तीनच लिफ्टचे काम सुरू असल्याचे निदर्शनास येते. याउलट भंगारात पाठवण्यात येणार्‍या चारपैकी तीन लिफ्टचा वापर परिवहन आयुक्त कार्यालयातील कर्मचारी व अधिकार्‍यांसह भेटीसाठी येणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे.

दोषी कोण ?
एमटीएनएलच्या इमारतीत एकूण चार लिफ्ट आहे. या चारही लिप्टचे ऑडीट एका खासगी कंपनीकडून करण्यात आले आहे. कंपनीने या चारही लिफ्ट काढून नव्या लिफ्ट लावण्याचा सूचना एमटीएनएलला दिल्या आहेत.मात्र एमटीएनएलच्या गलथान कारभारामुळे या आयुर्मान संपलेल्या लिफ्ट आज सुध्दा सुरू आहेत.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -