घरमुंबईमुंबईत १० आणि ११ ऑक्टोबरला 'या' विभागात पाणी कपात!

मुंबईत १० आणि ११ ऑक्टोबरला ‘या’ विभागात पाणी कपात!

Subscribe

मुंबईच्या काही भागामध्ये गुरुवार आणि शुक्रवारी पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे.

एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत असताना दुसरीकडे येत्या १० आणि ११ ऑक्टोबर रोजी मुंबईतल्या काही भागामध्ये पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबई महानगर पालिकेने हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी देखील करण्यात येणार आहे. त्यासाठी या विभागातल्या नागरिकांना आधीच पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे आवाहन मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणांची नावं, पाणी कपातीची वेळ आणि पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची वेळ देखील पालिकेकडून कळवण्यात आली आहे.

मुंबईच्या रेसकोर्स, हाजीअली या भागामध्ये असलेल्या १६०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीमधून गळती होत असल्याची बाब पालिकेच्या लक्षात आली. ही गळती मोठी असल्यामुळे तिची दुरुस्ती करणं आवश्यक असल्याचं देखील निदर्शनास आलं. या पार्श्वभूमीवर ही जलवाहिनी तातडीने दुरुस्ती करण्याचं काम हाती घेतलं जाणार असून त्यासाठीच मुंबईच्या काही भागांमध्ये पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

गुरुवारी म्हणजेच १० ऑक्टोबरला सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी या जलनाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात येईल. हे काम शुक्रवारी म्हणजेच ११ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सुमारे साडेअठरा तास दुरुस्तीचं काम सुरू राहणार आहे.

दोन दिवस राहणार पाणी बंद!

जलवाहिनीच्या दुरुस्तीदरम्यान महानगर पालिकेच्या डी आणि ई विभागांमध्ये ठराविक वेळेमध्ये पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. यात डी विभागात गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री ७ वाजून ३० मिनिटांपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणीकपात होणार आहे. त्यामध्ये तुकाराम जावजी मार्ग, ताडदेव मार्ग, साने गुरुजी मार्ग, तुळशीवाडी, आंबेडकर नगर, मुंबई सेंट्रल आणि महालक्ष्मी रेल्वे स्टेशन, स्लेटर रोड, ताडदेवचा आसपास भाग, गमदिया कॉलनी या भागांचा समावेश आहे.

- Advertisement -

पालिकेच्या ई विभागामध्ये गुरुवारी अर्थात १० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांपासून शुक्रवारी ११ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यात नायर रुग्णालय आणि कस्तुरबा गांधी रुग्णालय परिसराचा समावेश होतो. त्यामुळे पालिकेकडून आगोदरच्या दिवशी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -