घरमुंबईभिवंडीकरांना खुशखबर पाच गावांच्या पाणीयोजनांना मंजुरी

भिवंडीकरांना खुशखबर पाच गावांच्या पाणीयोजनांना मंजुरी

Subscribe

भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या आता सुटणार आहे. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी तत्काळ पाच गावांच्या पाणी योजनांना मंजुरी जाहीर केली आहे.

भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातील सावंदे, गोरसई, वालशिंद, देवराम पाडा, सरवली आदी ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या सुटणार आहे. आमदार रुपेश म्हात्रे यांनी विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित करताच पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी तत्काळ पाच गावांच्या पाणी योजनांना मंजुरी जाहीर केली आहे. त्यामुळे या भागातील पाण्यासाठीची वणवण आता थांबणार आहे.

मुख्यमंत्री पेयजल योजनेचा दुसर्‍या टप्प्यात समावेश

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे ३ मार्च २०१८ रोजी ५ गावांतील योजनांचा मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात समावेश करण्यासाठी लेखी निवेदनाद्वारे आमदार म्हात्रे यांनी मागणी केली होती. मागील वर्षी तालुक्याच्या ग्रामीण भागात १९ टँकरने पाणीपुरवठा केला होता. परंतु ठेकेदाराला ५५ लाख रुपये देण्यास पाणीपुरवठा विभागाकडून टाळाटाळ झाल्याने त्याने टँकरने पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला होता. पाणीटंचाईच्या समस्येवर पाणीपुरवठा विभागाकडूनही ठोस पावले उचलली जात नव्हती. त्यामुळे आमदार म्हात्रे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला.

- Advertisement -

भिवंडीतील संभाव्य टंचाईग्रस्त गावपाड्यांमध्ये १५ ठिकाणी लघु नळ पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. तसेच ९१ ठिकाणी विंधनविहिरी घेण्यात आल्या असून मतदारसंघातील सावंदे, गोरसई, देवराम पाडा, वालशिंद, सरवली या गावांचा मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात समावेश करण्यात येत आहे. या ५ गावांतील पाणी योजनांना पाणीपुरवठा विभाग तातडीने मंजुरी देत आहेत.

-बबनराव लोणीकर, पाणीपुरवठा मंत्री

- Advertisement -

– नितिन पंडित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -