घरमहाराष्ट्रअजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू; कॉंग्रेसच्या 'या' नेत्याच्या दाव्याने खळबळ

अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू; कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ

Subscribe

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर विजय वडेट्टीवार पहिल्यांदाच गडचिरोली येथे आले होते. रविवारी सत्कारानंतर वडेट्टीवार यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारपरिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांना हा दावा केला.

गडचिरोली : राज्यात कधी नव्हे तेवढ्या उलाढाली 2019 पासून सुरू आहेत. आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काही महिन्यांच्या तोंडावर आलेल्या असतानाही या राजकीय उलथापालथी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच आता कॉंग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांने राज्यातील राजकारणावर भाष्य करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री बनविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे म्हणताच राज्यात पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे.(Moves to make Ajit Pawar Chief Minister begin; Excitement by the claim of ‘Ya’ leader of Congress)

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांना बदलून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा भाजपचा डाव असल्याचा खळबळजनक दावा विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केला आहे. म्हणूनच शिंदे आजारी असल्याचा बनाव करण्यात येत आहे. असेही वडेट्टीवार म्हणाले. ते गडचिरोली येथे आयोजित पत्रकारपरिषदेत बोलत होते.

- Advertisement -

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर विजय वडेट्टीवार पहिल्यांदाच गडचिरोली येथे आले होते. रविवारी सत्कारानंतर वडेट्टीवार यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारपरिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांना हा दावा केला.

हेही वाचा : मनसेची पुढची तयारी लोकसभा निवडणुकीसाठी असेल – राज ठाकरे

- Advertisement -

वडेट्टीवारांनी हा केला दावा

यावेळी ते म्हणाले की, मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु मुख्यमंत्री कार्यालयाकडून याचे खंडन करण्यात आले होते. आज पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात आले आहे. हा सर्व प्रकार भाजपचा डाव असून शिंदेंना आजारी करून अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू आहे. तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात याच पार्श्वभूमीवर भेट झाली, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. यावेळी अजित पवार भेटीबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केल्यास लोकांच्या मनातील संभ्रम दूर होईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा : हुकूमशाहीचं सरकार आम्हाला पळवून लावायचंय; आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारवर साधला निशाणा

पृथ्वीराज चव्हाणांची ती शंका खरी ठरतेय की काय?

पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात झालेल्या त्या भेटीवर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जर अशी भेट झाली असेल तर दोन्ही नेत्यांपैकी कुणीतरी महाराष्ट्रासमोर येऊन हे काय चाललंय, हे सांगणे गरजेचे आहे. कारण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात दोन बैठका झाल्या. त्यात विविध नेते मंडळीही उपस्थित होते. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. भाजपने अजित पवारांना 10 ऑगस्टच्या सुमारास किंवा कधीतरी मुख्यमंत्री करतो, असा शब्द दिला होता. तो शब्द जर पूर्ण झाला नाही, तर त्यांचा पवित्रा काय असणार आहे? यासंदर्भात चर्चा झाल्याचे नाकारता येऊ शकत नाही, अशी शंका पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केली होती. आता वडेट्टीवार यांनी केलेला दावा, या दोन्ही नेत्यांच्या या दाव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -