पनवेल आणि प्रयागराज दरम्यान साप्ताहिक विशेष ट्रेन

Central Railway will run 42 special services during winter-Christmas
मध्य रेल्वे हिवाळी-ख्रिसमस दरम्यान ४२ विशेष सेवा चालवणार

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पनवेल आणि प्रयागराज दरम्यान पूर्णतः आरक्षित अतिजलद साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. खाली दिलेल्या तपशिलांनुसार:

०१९०४ विशेष अतिजलद २९ नोव्हेंबर २०२१ ते १३ डिसेंबर २०२१ पर्यंत पनवेल येथून दर सोमवारी २२.३० वाजता सुटेल आणि प्रयागराज येथे तिसऱ्या दिवशी ०३.३५ वाजता पोहोचेल.

०१९०३ विशेष अतिजलद २८ नोव्हेंबर २०२१ ते १२ डिसेंबर २०२१ पर्यंत प्रयागराज येथून दर रविवारी १७.२५ वाजता प्रयागराजहून सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी २०.५० वाजता पोहोचेल.

थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बिना, ललितपूर, टिकमगड, खरगापूर, महाराजा छत्रसाल स्टेशन छत्रपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकूट धाम, माणिकपूर, शंकरगड आणि नैनी

संरचना: १ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ७ द्वितीय आसन श्रेणी.

आरक्षण: पूर्णपणे आरक्षित विशेष ट्रेन क्रमांक ०१९०४ चे विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर  २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरू होईल.

या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.

या विशेष ट्रेनमध्ये बसण्यासाठी, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करून केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल.


हे ही वाचा – सांडपाण्याच्या पाईपमध्ये सापडले चक्क नोटांचे बंडल, कर्नाटकात अधिकाऱ्याच्या घरावर छाप्या दरम्यानची घटना