सांडपाण्याच्या पाईपमध्ये सापडले चक्क नोटांचे बंडल, कर्नाटकात अधिकाऱ्याच्या घरावर छाप्या दरम्यानची घटना

सांडपाण्याच्या पाईपातून १३ लाख रुपये जप्त केले.

Bundle of notes found in sewage pipe, incident during raid on official's house in Karnataka
सांडपाण्याच्या पाईपमध्ये सापडले चक्क नोटांचे बंडल, कर्नाटकात अधिकाऱ्याच्या घरावर छाप्या दरम्यानची घटना

कर्नाटकात लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी २४ नोव्हेंबरला कलबुर्गी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याच्या घरावर छापा टाकला आणि  मोठे आश्चर्य समोर आले. लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सांडपाण्याचा पाईप कापला असता पाण्याऐवजी चक्क नोटांचे बंडल बाहेर पडले. या सांडपाण्याच्या पाईपातून १३ लाख रुपये जप्त केले. कलबुर्गी जिल्ह्यातील जेवरगी तालुक्यात तैनात एसएम बिरादार यांच्या घरी कथितरित्या बेहिशोबी मालमत्ता आढळून आली, ज्यामुळे अधिकारी चक्रावून गेले.३६ एकर जमीन,कलबुर्गी जिल्ह्यात दोन घरे,बंगळूरुमध्ये एक भूखंड, तीन कार,एक स्कूल बस,  दोन ट्रॅक्टर, १०० ग्रॅम सोने आणि १५ लाख रुपये किमतीच्या घरगुती वस्तू  सापडल्या आहेत.

एसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही ५४.५ लाख रुपये रोख जप्त केले असून त्यापैकी १३ लाखांपेक्षा जास्त रक्कम अशा ठिकाणाहून सापडली आहे ज्याची कोणीही कल्पना करू शकत नाही. हे पैसे घराबाहेरील सांडपाण्याच्या पाईपमध्ये लपवून ठेवले होते, ज्याचा शोध चोरलाही लागला नाही.

सकाळपासून एसीबीने राज्यभरात ६० ठिकाणी छापे टाकले. बेंगळुरू, मंगळुरू, मांड्या आणि बल्लारी या विविध विभागांच्या १५ अधिकाऱ्यांच्या घरांवर ४०० ब्युरो अधिकाऱ्यांनी छापे टाकले. “आज आठ पोलिस अधीक्षक, १०० अधिकारी आणि ३०० कर्मचार्‍यांच्या पथकाने १५ अधिकार्‍यांच्या विरोधात उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांच्या बेहिशोबी मालमत्तेच्या संदर्भात ६० ठिकाणी शोध घेतला,” एसीबीने येथे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.बिरादार हे कर्नाटक सरकारच्या त्या १५ अधिकाऱ्यांपैकी एक आहेत ज्यांच्या निवासस्थानांवर बुधवारी एसीबीने छापे टाकले.


हे ही वाचा – Salman Khan ने सेलिब्रेट केला वडिल सलीम खान यांचा ८६वा वाढदिवस