घरमुंबईविधान परिषद निवडणुकीत कोण फुटले हे निकालानंतर कळेल - हितेंद्र ठाकूर

विधान परिषद निवडणुकीत कोण फुटले हे निकालानंतर कळेल – हितेंद्र ठाकूर

Subscribe

विधान परिषदेच्या निवडणुकीत कोण फुटले? हे निकालानंतर केळेल. जो हरला, तो खापर फोडणारच. आमदार म्हणजे काय मच्छिमार्केट आहे का? कोणाला पैसे दिले, हे एकदा जाहीर करा. ज्यांनी पैसे घेतले, त्यांना घेऊन लोकांसमोर या. वायफळ बडबड करणे हे काही खरे नाही, असे वक्तव्य बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूरू यांनी केले.

हिंतेद्र ठाकूरांचे सूचक वक्तव्य –

- Advertisement -

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर आमदरा हिंतेद्र ठाकरू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सर्वपक्षातील लोकांशी आमचे चांगले संबंध आहेत.त्यामुळे सर्वजण मला मानतात. माझ्यावर सगळे विश्वास दाखवतात. या सगळ्या पक्षांचा मी आभारी आहे. निकाल लागल्यावर कळेल की कोण फुटला आहे ते. जो हरतो, तो दुसऱ्यावर खापर फोडतो, असा टोलाही ठाकूर यांनी लगावला.

संजय राऊतांनी आमच्यावर आरोप केला नाही – 

- Advertisement -

आमदार म्हणजे काय मच्छीबाजार आहे. संजय राऊत यांनी आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप केलेला नाही. फक्त आमची मते मिळाली नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी माझ्यावर आरोप केलेला नव्हता, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना गद्दारीबाबत भाष्य केले हेाते. त्याबाबत ठाकूर म्हणाले की, गद्दार कोण आहे, आपल्या आईचे दूध विकू नये वैगेरे ते बोलले आहेत. त्यांनी काही चुकीचे बोलले नाहीत.

क्षितिज ठाकूरांनी केले मतदान – 

क्षितिज ठाकूर हे आमच्या कुटुंबातील एका सदस्याच्या उपचारासाठी गेले होते. पण, आमच्या राजकीय मित्रांनी आम्हाला येण्याची फारच गळ घातली. लोकशाही टिकवली पाहिजे; म्हणून क्षितिज ठाकूर हे थेट परदेशातून विमानतळावर उतरले आणि तिकडून विधान भवनात पोचले आहेत, असे असे हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -