घरमुंबईऔरंग्याच्या घोषणांचा उद्धव ठाकरे निषेध करणार का? बावनकुळेंचा सवाल

औरंग्याच्या घोषणांचा उद्धव ठाकरे निषेध करणार का? बावनकुळेंचा सवाल

Subscribe

बुलढाणा : नुकताच महाराष्ट्रात औरंगजेबाच्या (Aurangzeb) नावावरून कोल्हापूरमध्ये हिंसाचाराची घटना घडल्यानंतर आता पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) बुलढाण्यातील सभेत जनतेला संबोधित करत असताना त्यांच्या समर्थकांनी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. या प्रकरणी व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलीस तपासणी करत आहेत. या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. (Will Uddhav Thackeray protest against Aurangyas announcements The question of Bawankules)

हेही वाचा – ओवेसींच्या सभेत औरंगजेबाच्या घोषणा; महाराष्ट्रात वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता

- Advertisement -

बावनकुळे म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या मातीत औरंग्याचा उदोउदो करणारी अवलाद पुन्हा डोकं वर काढत आहे. बुलडाण्यात असुदुद्दीन ओवेसींच्या भाषणावेळी औरंग्याच्या समर्थनात घोषणा देण्याचा संतापजनक प्रकार समोर येत आहे. सरकारनं सत्य तपासून कारवाई करावी आणि दोषींना धडा शिकवावा. यापूर्वीही प्रकाश आंबेडकर औरंग्याच्या कबरीवर माथा टेकवून आले; पण हिंदुत्वाच्या गप्पा मारणारे उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प बसले आहेत. आता किमान ओवेसीच्या सभेतील औरंग्याच्या घोषणांचा उद्धव ठाकरे निषेध करणार आहेत की बाटगी भूमिका घेणार आहेत?, असा प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. 

- Advertisement -

हेही वाचा- मी म्हणजे मालक… दिल्लीत चाललं नाही, गल्लीत काय चालणार? राऊतांचा शंभूराज देसाईंना टोला

औरंगजेबाचा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू

दरम्यान, कोल्हापूरसह अहमदनगर व्हॉट्सअप स्टेट्सला औरंगजेबाचा फोटो लावल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला होता. मोठ्या संख्येने हिंदू कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यावेळी ओवेसी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्धही पाहायला मिळाले. तसेच काही दिवसांपूर्वी बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन पुष्प अर्पण केले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मुंबईत औरंगजेबाचे पोस्टर पाहायला मिळाले होते. या पोस्टर्समध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत औरंगजेबाचा फोटो होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -