घरमुंबईझोपेत स्कायवॉकवरून पडून महिलेचा 'मृत्यू'

झोपेत स्कायवॉकवरून पडून महिलेचा ‘मृत्यू’

Subscribe

अंबरनाथ येथे स्कायवॉकवरून पडून एका ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी परिसरात जोरदार खळबळ उडाली आहे.

अंबरनाथ येथे आज सकाळी एका ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक घटना म्हणजे अंबरनाथच्या स्कायवॉकवरुन पडून या महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कल्पना संपत सानप (३६) असे या महिलेचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला स्कायवॉकवर झोपलेली होती. दरम्यान, झोपेत असताना तिचा तोल गेल्याने ही दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

नेमके काय घडले?

अंबरनाथ येथील गांधीनगर परिसरात कल्पना सानप (३६) ही महिला राहत होती. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ती रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या स्कायवॉकवर झोपलेली होती. आज, शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तिचा झोपेत तोल जाऊन ती स्कायवॉकवरून खाली पडली आणि त्यात तिचा मृत्यू झाला आहे. तसेच ती उंचावरुन पडल्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि तिचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी असलेल्या रिक्षाचालक आणि दुकानदारांनी या घटनेची त्वरित माहिती पोलिसांना फोन करून देण्यात आली. अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि कल्पनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी सदर घटनेची नोंद आकस्मित मृत्यूची नोंद म्हणून केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -